Maharashtra politics: केसीआर यांच्या दौऱ्यामागं मोठं राजकारण; ठाकरे गटाचा खळबळजनक दावा

चंद्रशेखर राव हे त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत.
Sanjay Raut on Telangana Telangana CM K Chandrasekhar Rao Maharashtra politics
Sanjay Raut on Telangana Telangana CM K Chandrasekhar Rao Maharashtra politics
Updated on

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष केसीआर म्हणजेच के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे औचित्य साधून के. चंद्रशेखर राव हे त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूरला येत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाने खळबळजनक दावा केला आहे. (Sanjay Raut on Telangana Telangana CM K Chandrasekhar Rao Maharashtra politics)

संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केसीआर यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य केलं. केसीआर यांच्या दौऱ्यामागं मोठं राजकीय कारस्थान आहे. तसेच केसीआर भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत. असा दावादेखील संजय राऊता यांनी केला.

त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. (Latest Marathi News)

Sanjay Raut on Telangana Telangana CM K Chandrasekhar Rao Maharashtra politics
KCR : "बॅनरवर पांडुरंग अन् मटणावर ताव', उद्या विठोबाचं दर्शन अन् आज केसीआरच्या ताफ्याला मटण पार्टी

काय म्हणाले संजय राऊत?

अचानक महाराष्ट्रात पैशांचा ओघ कसा वळला? विठ्ठल भक्ती कशी अवतरली? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, महाराष्ट्रात मतांचं विभाजन करण्यासाठी बीआरएस आलं आहे. बीआरएसकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही. केसीआर यांच्या दौऱ्यामागं मोठ राजकीय कारस्थान. एमआयएमने जे केलं तेच बीआरएस करत आहेत.

सगळं विरोधीपक्ष एकत्र आले असताना केसीआर आमच्यासोबत यायला हवे होते. पण ते आले नाहीत. भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत. (Latest Marathi News)

Sanjay Raut on Telangana Telangana CM K Chandrasekhar Rao Maharashtra politics
Prakash Ambedkar : छत्रपती संभाजीराजेंना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

राज्यात मविआ भक्कम आहे. केसीआर यांची नियत चांगली नाही. तेलंगणात बीसीआरसमोर काँग्रेसचं आव्हान आहे. भाजपचं नाही. ईडी सीबीआयच्या जोरावर भाजपच सरकार सुरु आहे. असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाण साधला.(Latest Marathi News)

जागावाटपासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, विरोधी पक्षांनी जागावाटपांवर काही ठिकाणी बलिदान द्यायला हवं. लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्षांनी समजूतीनं राहायला हवं. असं सांगत पाटण्यातील फॉर्म्युला १०० टक्के यशस्वी होणार. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.