त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकारावरुन सध्या राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. त्याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. (Sanjay Raut on Trimbakeshwar Controversy allegations against Devendra Fadnavis)
रामनवमीच्या काळात महाराष्ट्रात दंगली घडत होत्या त्यावेळी एसआयटी नेमावी वाटली नाही का? आता कसली एसआयटी नेमत आहात? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
त्र्यंबकेशवर प्रकरणात मी माहिती घेतली. शंभर वर्षाची परंपरा असून ते लोक मंदिराच्या गेटवरून देवाला धूप दाखवतात आणि पुढे त्यांच्या मार्गाला लागतात. आम्ही, प्रधानमंत्री सुद्धा अनेक वर्षापासून अजमेर शरीफ दर्ग्यावर, मुंबईच्या हाजी अली दर्ग्यावर दर्शनासाठी जात असतो.
असे सांगत, त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू असलेली सर्व घडामोडी ठरवून केलेली आहे. मंदिर प्रशासनावर दबाव आणून त्यांना तक्रार अर्ज द्यायला लावला आहे. असा गंभीर आरोपदेखील राऊत यांनी यावेळी केला.
निवडणूकीच्या आधी हनुमान चालीसा पठण करतात, उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करून वातावरण बिघडवतात हे त्यांचे धंदे, हा त्यांचा व्यवसाय आहे. अशा शब्दात टीकास्त्र सोडत हिंदुत्व ही शिवसेनेचा धंदा नाही, रोजी रोटी नाही हिंदुत्व ही आमची श्रद्धा आहे, असे राऊत म्हणाले.
नेमकं काय आहे प्रकरण?
त्र्यंबकेश्वर येथे 13 मे रोजी एका गटाकडून धार्मिक यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी काही जणांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मंदिरातील पुरोहितांनी त्याला विरोध केला. मंदिरातील सुरक्षा रक्षकांनीही अडवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी यानंतर रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे या प्रकाराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण तापलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.