समाजविघातक घटक म्हणून आमचे फोन टॅप : संजय राऊत

Sanjay Raut on Phone Tapping Case
Sanjay Raut on Phone Tapping Casee sakal
Updated on

मुंबई : रश्मी शुल्का यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील काही नेत्यांचे फोन टॅप (Rashmi Shukla Phone Tapping Case) केले. त्यावरूनच आज संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि माझा फोन समाजविघातक घटक या नावाखाली टॅप करण्यात आला. कोणाला कोणाला ड्रग्स पेडलर, कोणाला गँगस्टर बनविण्यात आले होते, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Phone Tapping Case
शिवसेनेच ठरलं! मे महिन्यात अयोध्येला जाणार - संजय राऊत

समाजविघातक घटक सांगून आमचे फोन टॅप करण्यात आले. २०१९ साली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनत होतं. त्यावेळी आमच्यावर पाळत ठेवत होते. आम्ही काय बोलतोय हे ऐकलं जात होतं. केंद्र रश्मी शुक्लासारख्या अधिकाऱ्यांना पाठबळ देतंय हे चुकीचे आहे, असंही राऊत म्हणाले.

'भोंग्यामुळे हिंदूत्व बदनाम होतंय' -

भोंग्याच्या संदर्भात राष्ट्रीय धोरण बनवले पाहिजे. हे पूर्ण देशात लागू करण्यात यावे. सर्वात आधी बिहार आणि दिल्लीमध्ये हे धोरण लागू करा. बिहार, गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन पाहा. अजूनही भोंगे कायम आहे. गोवंश हत्यासंदर्भात तुम्ही राष्ट्रीय धोरण बनवले. पण, काही राज्यांनी तुमचं धोरण स्वीकारण्यास असहमती दर्शवली. सध्या राजकीय भोंग्याचा विषय सुरू आहे ते एक ढोंग आहे. पण, हे ढोंग फार काळ चालणार नाही. यामुळे हिंदूत्व बदनाम होत आहे. भोंग्याबाबत सर्वांसाठी सारखेच नियम असावेत, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींना आवाहन करत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंना टोला -

आम्हाला भोंग्यासाठी कोणाकडून अक्कल शिकण्याची गरज नाही. मुंबईतील रस्त्यावरील नमाजाबाबत बाळासाहेबांची भूमिका होती. ते फक्त भूमिका घेऊन शांत बसले नाही. त्यांनी भाजप सेना युतीचं सरकार येताच सर्व मौलवींची बैठक घेऊन रस्त्यावरील नमाज बंद केले. त्यांनी मशिदीसाठी अधिक जागा दिली. आम्ही मुस्लीम समाजाच्या संदर्भातील समस्या या चर्चेतून सोडवल्या, असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब स्वतःचे निर्णय स्वतः घेत होते. त्यांच्यावर कोणी निर्णय लादत नव्हतं, असा टोला देखील त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()