50 बंडखोर आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीत का बसलाय? राऊतांचा सवाल

बाप बदलण्याची भाषा आधी गुलाबराव पाटील यांनी केली होती, राऊतांचं स्पष्टीकरण
Sanjay Raut on Eknath shinde | Maharashtra Political Crisis
Sanjay Raut on Eknath shinde | Maharashtra Political CrisisSakal
Updated on
Summary

बाप बदलण्याची भाषा आधी गुलाबराव पाटील यांनी केली होती, राऊतांचं स्पष्टीकरण

बंडखोरांचा आत्मा मेला असून आता फक्त त्यांची प्रेत उरली आहेत. सगळेच जवळेचे आता गद्दार झाले आहेत त्यामुळे मंत्री उदय सामंत यांच्या जाण्याने सेनेला कोणताही धक्का बसलेला नाही. बाप बदलण्याची भाषा आधी गुलाबराव पाटील यांनी केली होती. (maharashtra politics) बंडखोरांचा मराठी भाषेची संपर्क तुटलेला असल्याने माझ्या भाषणाचे चुकीचे अर्थ काढले जात आहेत, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ते मुबंईत बोलत होते. तुमच्या जास्तीचा आकडा आहे मग, 50 बंडखोर आमदार सोबत गुवाहटीत का बसलाय? असा सवालही राऊतांनी शिंदे गटाला केला आहे. (Sanjay Raut on Eknath Shinde)

माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, सध्या राज्यातील जनता संतापली आहे. हा संताप कोणीही रोखू शकणारी नाही. सेनेतील सगळे जवळचे गद्दार झाले असल्याे आता आत्मा मेलेल्यांकडून कसली अपेक्षा करायची असा सवालही त्यांनी बंडखोरी आमदारांना केला आहे. सगळेच जवळचे गद्दार झाले आहेत त्यामुळे सामंताच्या जाण्याने धक्का बसला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Political Crisis)

Sanjay Raut on Eknath shinde | Maharashtra Political Crisis
एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दुसऱ्यांदा फोन, बंडखोरांसमोर नवे पर्याय?

पुढे ते म्हणाले की, या बंडखोर आमदारांना ईडी किंवा सीबीआय नाही, तर जनता देणार आहे, हे लक्षात असुदेत. बंडखोर आमदारांंचा मराठी भाषेची संपर्क तुटला आहे, त्यामुळे माझ्या वक्तव्याचे चुकीचे अर्थ काढले जात आहेत, असही ते म्हणाले आहेत. तुमच्याकडे बहुमत आहे तर 50 बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीत का बसला आहात? असा सवालही राऊतांनी शिंदे गटाला केला आहे. शिंदे गटाने भाजप, प्रहार किंवा मनसे कुणासोबत जावं. कायदेशीर अंमलबजावणी करून सोळा बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.(Sanjay Raut News)

गुवाहाटीत बसण्याऐवजी मुंबईला या चर्चा करु, मार्ग काढू अंसही राऊतांनी शिंदे गटाल सुचवलं आहे. तुम्ही या इथे येण्यास कुणी रोखल आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. महाराष्ट्राचे पोलिस तुम्हाला संरक्षण करण्यास समर्थ आहेत, मात्र तुम्हाला अंतिमत: भाजपाची गुलामी पत्करुनच संरक्षा मिळवावा लागत आहे. इतके वणवण फिरण्याची आवश्यकता नाही, असंही ते म्हणाले आहेत.

Sanjay Raut on Eknath shinde | Maharashtra Political Crisis
पाच दिवसात तीनदा दिल्ली वारी; फडणवीसांच्या भाजप नेत्यांबरोबर बैठका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.