Maharashtra Politics : सत्तास्थापनेचा वेग राफेलपेक्षा जास्त - राऊत

याप्रकरणी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि न्यायाची मागणी करू - खासदार राऊत
Sanjay Raut on BJP
Sanjay Raut on BJPSakal
Updated on

सध्या राज्यातील राजकीय वातावरण आणि बदल पाहता भाजप घटनेच्या चिंधड्या करत असल्याचे चित्र आहे. सेनेच्या १६ आमदारांचं अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. अजूनही हे प्रकरण कोर्टात असताना बहुमत चाचणीची आदेश का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (maharashtra politics) देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणी हस्तक्षेप करावा लागत आहे. याप्रकरणी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि न्यायाची मागणी करू, असंही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा वेग राफेलपेक्षा जास्त असल्यांचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. (Sanjay Raut on BJP)

Sanjay Raut on BJP
UP : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बापाला जन्मठेपेची शिक्षा

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, सत्ताबलासाठी भाजपकडून हालाचालींचा वेग वाढला आहे. राज्यपाल यांच्या आदेशांचा वेग हा राफेलपेक्षाही अधिक गतीचा आहे. राज्यपालांवरही दबाव असू शकतो. आमचे आमदार तोडण्यात भाजपचा हात आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी फडणीसांकडून प्रयत्न केले जात आहे. सत्तेसाठी भाजपच्या वेगवान घडामोडी सुरू झाल्या असून ही महाराष्ट्राचे तुकडे करण्याची ही योजना आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, सरकार डळमळीत होण्याची भाजप वाट पाहत आहे. त्यामुळंच दोन आमदारांची फाईल रखडवली आहे. याप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करणं हे असंवैधानिक आहे, असंही राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याची त्यांची भूमिका आहे. अडीच वर्ष त्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. आता त्यांना स्वप्नपूर्ती होईल असं वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

Sanjay Raut on BJP
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.