पंकजा मुंडेंबद्दल खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

panku.jpg
panku.jpg
Updated on

मुंबई : राज्याच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे  मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते १२ डिसेंबरला कळलेच, असं सूचक विधानदेखील राऊत यांनी केलं. विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने भाजपचे 4 आमदार व पंकजा मुंडे या लवकरच पक्षाला रामराम ठेकणार आहेत.

फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ''पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.” 

एकीकडे ही फेसबुक पोस्ट तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब असं चित्र आहे. पंकजांनी आपल्या ट्विटर हॅण्डलमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. यापूर्वी पंकजांच्या ट्विटर प्रोफाईलध्ये मंत्रिपदाचा उल्लेख होता. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तो हटवण्यात आला.

आता त्यांच्या प्रोफाईलवर भाजपबाबत कोणताही उल्लेख नाही. ट्विटर अकाऊंटच्या कव्हरपेजला जनतेला नमस्कार करणारा पंकजांचा फोटो आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. पंकजा मुंडे येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जन्मदिवस. त्यामुळेच जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर संवाद साधण्यासाठी पंकजांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. आता त्या खरच पक्षाला धक्का देणार असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.

तसेच पंकजा यांच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की, पंकजा यांना जाणीवपुर्वक भाजपनेच अडचणीत आणले आहे. सुरवातीला त्यांचा चिक्की घाेटाळा देखील भाजपच्या काही नेत्यांनीच त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी पुढे आणल्याचे त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. तसेच त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील माजी मुख्यमंत्र्यांच्या गटाने त्यांना पराभूत करण्यासाठी विरोधी उमेदवाराला रसद पुरवली आसल्याचा आरोप देखील मुंडे यांचे कार्यकर्ते करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते १२ डिसेंबरला कळलेच, असं सूचक विधानदेखील राऊत यांनी केलं.  आता त्या 12  तारखेला काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.