Devendra Fadnavis: "पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची..."; सिंचन घोटाळा फेम अजित पवार म्हणत राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut reply to devendra fadnavis over nawab malik support shinde govt assembly winter session
Sanjay Raut reply to devendra fadnavis over nawab malik support shinde govt assembly winter session
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांनी काल सुरू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला. सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसलेल्या मलिकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत अजितदादांना थेट पत्र लिहिलं आहे. तसेच मलिकांना महायुतीत घेता येणार नाही, असंही म्हटलं. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान मलिकांच्या सभागृहातील उपस्थितीने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सत्ता येते आणि जाते, पक्ष सत्तेपेक्षा महत्वाचा... असं म्हणते अजित पवरांना खुले पत्र लिहीलं होतं. विरोधकांकडून फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी "पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची.." असं कॅप्शन देत पोस्ट केली आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटलंय?

"अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली.महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते..त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल,सिंचन घोटाळा फेम अजित पवार,ED फेम भावना गवळी,सरनाईक, मुलुंड चे XXX पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे..यांचा देश हा असा आहे!हल्ला फक्त मलिक यांच्यावर.बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी..जात मांजराची..." अशी खोचक पोस्ट संजय राऊतांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पावारांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिकांवर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं मत आहे, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे.

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळं महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणा-या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()