पहिल्या फेरीत भाजपचे दोन उमेदवार निवडून येतील, खासदार राऊतांचं भाकीत
आज महाराष्ट्रात राज्यसभेसाठी निवडणुक पार पडत आहे. भापज आणि महाविकास आघाडीसाठी ही अटीतटीची निवडणुक मानली जात आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण पेटलं आहे. (Rajyasabha Election 2022 Live) भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. सध्या मविआ आणि भाजपचे सर्व आमदार विविध ठिकाणी रिसॉर्ट्सवर दाखल झाले आहेत. एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत आहेत. (Sanjay Raut latest Political news)
दरम्यान, आज मतदानादिवशी शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा दावा केला आहे. 'सकाळ'शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपला धक्का बसू नये ही आमची इच्छा असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. ते म्हणाले, निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार आहेत. पहिल्या फेरीत भाजपचे दोन उमेदवार निवडून येतील. भाजप ज्याप्रमाणे वातावरण निर्माण करतंय ते पूर्णपणे चूकीचं आहे. हा भ्रम निर्माण केला जात आहे.
पुढे ते म्हणाले, १६९ आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानं एक जागा रिकामी आहे. यापेक्षा जास्त आकडे जरी झाले, तरी भाजपला धक्का बसू नये अशी आमची इच्छा आहे, असं टोमणाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीची 42 मतांचा कोटा शरद पवारांना अचानक 44 चा केला आहे. यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. सेनेचे नेते रात्रीतून पवारांच्या भेटीला गेले. अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंतांनी शरद पवारांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांचा कोटा वाढवल्याने आता मविआच्या चौथ्या जागेसाठीची मतांची जुळवाजुळव करताना दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रतिष्ठेची होणार आहे हे स्पष्ट झालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.