शिवसेनेच्या रडारवर भाजपचे 'साडे तीन नेते'; 'ही' नावं चर्चेत

शिवसेनेकडून आज मुंबईत पत्रकार परिषद; राजकीय वर्तुळात खळबळ
Sanjay Raut -Kirit Somaiya
Sanjay Raut -Kirit SomaiyaTeam eSakal
Updated on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना (Shivsena) आज मुंबईत (Mumbai) महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी बोलताना भाजपच्या (BJP) साडेतीन नेत्यांना आम्ही तुरूंगात टाकू असं म्हटलं होतं. त्यामुळे आता हे साडेतीन नेते कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.(Sanjay Raut Allegations)

फडणवीस निशाण्यावर ?

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेबद्दल माहिती देताना भाजपचे साडेतीन नेते त्यांच्या रडारवर असल्याची माहिती दिली. त्यामुळे आता हे नेते नेमके कोण अशी चर्चा सुरू आहे. तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचा इशारा असल्याची शक्यता आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुक प्रतिज्ञापत्रात आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आल्याचं समजतंय. न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही आयोगापासून माहिती लपवल्या प्रकरणी शिक्षा सुनावली होती. फडणवीस यांचं प्रकरण देखील त्याच स्वरुपाचं आहे. या प्रकरणात ते गोत्यात येण्याची शक्यता आहे. तर दुसरी बाब म्हणजे फडणवीस यांच्या भावावर देखील आरोप होऊ शकतात.

Sanjay Raut -Kirit Somaiya
EDचं मोठं ऑपरेशन; 'हसीना पारकर'च्या घरावर छापा, एक जण ताब्यात

प्रविण दरेकर अडचणीत?

मुंबै बँक प्रकरणात प्रवीण दरेकर सध्या अडचणीत सापडलेत. त्यांनी मुंबै बँकेत मजूर म्हणून निवडणुक लढवल्यामुळे अडचणीत आहेत. हे प्रकरण आता औद्योगिक न्यायालयाच्या कोर्टात प्रलंबित असून, हा मुद्दा आता पुन्हा एकदा उकरून काढण्यात येईल अशी शक्यता आहे.

Sanjay Raut -Kirit Somaiya
तपास यंत्रणांच्या छाप्यात नावं घुसवली जातील? संजय राऊतांना शंका

प्रसाद लाड?

मुंबई महानगर पालिकेत 2009 साली प्रसाद लाड यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 2014 मध्ये या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तब्बल शंभर कोटींपर्यंतचा हा घोटाळा असल्याची शक्यता असून, पुन्हा हे प्रकरण वर येण्याची शक्यता आहे.

नील सोमय्या कोण आहेत ?

फडणवीस, लाड आणि दरेकरांनंतर सर्वात महत्वाचं नाव म्हणजे निल किरीट सोमय्या. निल सोमय्या हे मुलुंड मधील भाजपचे नगरसेवक असून, ते भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव आहेत. एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने २०२० साली जानेवारी महिन्यात आपल्या दोन टॉवर्सशी निगडीत कामं एका खाजगी ठेकेदाराला दिली होती. पण नील सोमय्या यांच्याशी संबंधित असलेल्या काही लोकांनी ठेकेदाराला थेट नील सोमय्या यांच्या कार्यालयात बोलावून एका टॉवरचं काम त्याच्याकडून काढून घेतलं. पण काही दिवसांनी पुन्हा नील सोमय्या यांच्या लोकांनी ठेकेदाराला निल यांच्या कार्यालयात बोलावलं आणि नील यांच्या उपस्थितीतच त्या ठेकेदाराला धमकी दिली. तसंच त्याच्याकडून दुसऱ्या टॉवरचं कामही दे किंवा त्याबदल्यात आम्हाला फायदा करून दे. याच प्रकरणात गुन्हा दाखल होऊन वर्षभराने नील यांची चौकशी होऊन जबाब नोंदवण्यात आला होता .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()