ED ने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSanjay Raut Latest News
Updated on

मुंबई : ईडीला माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सापडलेले नाही. मी कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. कोणता पत्रा सडलेला आहे हे मला माहिती नाही. चाळ कुठे आहे मला माहिती नाही. माझ्यावर कारवाई करून शिवसेनेला व महाराष्ट्राला लढण्याचे बळ मिळत असेल तर मी बलिदान द्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका वृत्तवाहिनीला भ्रमणध्वनीवरून दिली. (Sanjay Raut Latest News)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर रविवारी (ता. ३१) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) (ED Action) धाड टाकली. तब्बल साडेनऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतले. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात आली. शिवसेनेला तोडायचे आहे. मोडायचे आहे. उद्धव ठाकरे यांना कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Sanjay Raut Latest News
ED Action : केंद्र, राज्य सरकारने ईडीचा आदर्श घ्यावा; अमोल मिटकरींचा सल्ला

बदल्याच्या भावनेने माझ्यावर कारवाई केली जात आहे. माझ्यावर कारवाई केल्याने शिवसेनेला व महाराष्ट्राला लढण्याचे बळ मिळत असेल तर मी बलिदान द्यायला तयार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई केली जात आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेला (Shiv sena) संपवण्यासाठी कारवाई केली जात आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कसे लढायचे हे मला माहिती आहे. संघर्ष करण्याचे गुण आमच्यात आहे. मी घाबरणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले. मी वेळ वाढवून मागितला होता. परंतु, कोणतीही नोटीस न देता ईडीचे अधिकारी घरात घुसले, असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.