शिवसेनेतून बंड करत बाजूला झालेल्या एकनाथ शिंदेंनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून या दोघांवरही टोलेबाजी केली आहे. (Shivsena Saamna Editorial)
शिवसेनेबद्दलची नाराजी हा बनाव होता, अशी टीका एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) केली आहे. तर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घ्यायचं हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रिपदावरुन युती का तोडली? असा सवाल देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. महाराष्ट्रात गुरुवारी जे घडलं त्यावरुन सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळं झूठ यावरच शिक्कामोर्तब झालं. सत्तेसाठी आम्ही शिवसेनेशी दगाबाजी केली नाही, असं सांगणाऱ्यांनीच मुख्यमंत्रिपदाचा मुकूट स्वतःवर चढवून घेतला. तोदेखील कोणाच्या पाठिंब्यावर, तर या सर्व बंडाशी आमचा काही संबंध नाही, असा भाव जे साळसूदपणे आणत होते, त्यांच्या पाठिंब्यावर. म्हणजे शिवसेनेवरची (Shivsena) नाराजी वगैरे हा सगळा बनाव होता, असंही 'सामना' अग्रलेखात म्हटलं आहे. (ShivSena Criticize Eknath Shinde)
सामनामध्ये फडणवीसांना प्रश्नही विचारण्यात आला आहे. अग्रलेखात पुढे म्हटलंय की, हाच अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता, मग तेव्हा मुख्यमंत्रिपदावरुन युती का तोडली? ठीक आहे, अनैतिक मार्गाने का होईना तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय? हा प्रश्न उरतोच. त्याचं उत्तर जनतेला द्यावं लागणार आहे. कौरवांनी द्रौपदीला भरसभेत उभं करुन बेइज्जत केलं आणि धर्मराजासह सगळेच निर्जीव बनून हा तमाशा पाहत राहिले. तसंच काही महाराष्ट्रात घडलं. पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यांनी द्रौपदीच्या अब्रूचे, प्रतिष्ठेचे रक्षण केले. जनता जनार्दन श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल व महाराष्ट्राची अब्रू लुटणाऱ्यांवर सुदर्शन चक्र चालवील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.