राज्यात मागील काही दिवसांपासून महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलेलं दिसत आहे. राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल वादग्रस्त वक्तव्य याविरोधात महाविकास आघाडी उद्या १७ डिसेंबरला मोर्चा काढणार आहे. यादरम्यान संजय राऊत आणि भाजपही उद्या मुंबईत माफी मांगो आंदोलन करणार असल्याचे अशिष शेलार यांनी सांगीतलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून टीका करणाऱ्या भाजपच्या अशिष शेलार यांना राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, माझ्या विरोधात मोर्चा काढण म्हणजे उद्याच्या संयुक्त मोर्चासंदर्भातील मोर्चाला अपशकून करण्यासाठी केलं जात असल्याचे म्हणाले आहेत, भारतीय जनता पक्षाला नैराश्य आलं आहे त्यातून हे प्रकार सुरू आहे.
हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते की नाही? आम्ही म्हणतो, डॉ. आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. या देशात ते मध्यप्रदेशात मध्ये जन्माला आले की अजून कुठल्या देशात जन्माला आलेत नाही.. ते आधी महाराष्ट्राचे आहेत त्यानंतर ते विश्वाचे विश्वरत्न झाले. घटनाकार, महान विभूती म्हणून त्यांची संपूर्ण जडणघडण महाराष्ट्रात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मातृभाषा मराठी आहे. चैत्यभूमी देखील महाराष्ट्रत निर्माण झाली, ते महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत असे राऊत यावेळी म्हणाले.
तर त्यांच्या डोक्यातील किड्यांचे..
त्यांच्या विषयी आज भाजप जे राजकारण करतंय त्यांना लाज वाटली पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत की नाहीत या एकाच प्रश्नाचे उत्तर द्या. आम्ही म्हणतो आहेत. ते देशाचे महान नेते झाले. ते जगातल्या पददलीतांचे आशास्थान झाले पण त्यांची मुळं महाराष्ट्रात आहेत एवढंच मी म्हणतोय. कशाकरता माफी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत असं बोलल्याबद्दल कोणाला माफी हवी असेल तर त्यांच्या डोक्यातील किड्यांचे संशोधन करायला पाहीजे असेही राऊत म्हणाले.
भाजपकडून बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याच्या वक्तव्यावरून हल्लाबोल करण्यात आला. आशिष शेलार यांनी यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणणाऱ्या संजय राऊतांवर निशाणा साधला होता.
शेलार म्हणाले की, आंबेडकरांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने सुरु असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की हा वाद जाणीवपूर्वक सुरु असून, त्यामागील कारणं अस्पष्ट आहेत. एखादं संकट आल्यावर शेतकऱ्याला ते अस्मानी आहे की सुलतानी असा प्रश्न पडतो. तसा आंबेडकरप्रेमी, समस्त भारतीय नागरिकांवर आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करत अफगाणी संकट आणलं आहे, अशी टीका यावेळी शेलारांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.