शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीचा वापर महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी होत असल्याचं म्हटलंय. दोन मंत्र्यांचा राजीनामा आणि सरकार पाडण्यासाठी दबाव येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंबंधी ते लवकरच पुरावे सादर करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. (Sanjay Raut alleges ED over political intervention)
यासंबंधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सक्तवसुली संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं म्हटलं. सध्या ईडीच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रत दाखल आहेत. त्या बिहार, उत्तर प्रदेशात दाखल नाहीत, असं राऊत म्हणाले. ईडीच्या मार्फत देशात क्रिमिनल सिंडिकेट चालवलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. (Criminal Syndicate by ED)
दादरा नगर हवेलीतील विजयानंतर भाजपमार्फत ईडीच्या रेडचं सत्र सुरू झालं. महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगडमध्ये जे काही चाललंय ते वाईट आहे. मी पत्र लिहिल्यानंतर त्यावर देशभरात पडसाद उमटत आहेत. माझी भूमिका मी निभावली!
केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून सरकारं अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी काहींनी माझ्यावरही दबाव टाकला. ईडीने आतापर्यंत २८ जणांची बेकायदेशी चौकशी केली आहे. यापुढे मी ईडीचे लोक कसे आर्थिक घोटाळे करतात आणि पैसे गोळा करण्यासाठी कशा पद्धतीने ब्लॅकमेल करतात, याचे पुरावे देणार आहे. हुकूमशाही पद्धतीने राज्य करणार असाल तर तुमची पूर्ण पोलखोल करावी लागेल, असा इशारा राऊतांनी दिला.
अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत तुम्हाला डांबू
पवारांकडे पाच दिवस ईडीची माणसं जाऊन बसली होती. आम्ही गुढघे टेकऊ असं वाटत असेल तर आम्ही जुमानणार नाही. अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत तुम्हाला डांबू, असा धमक्या देत आहेत. पण आम्ही त्या कोठडीत गेलो तर तुम्हालाही बाजूच्या कोठडीत ओढून आणू, असा इशारा राऊत यांनी दिलाय.
मुलीच्या लग्नातील फूलवाले आणि डेकोरेशनवाले यांना उचलून आणलं
माझ्या मुलीच्या लग्नातील फूलवाले आणि डेकोरेशनवाले यांना यंत्रणांनी उचलून आणलं. त्यांना गनपॉइंटवर ठेऊन धमक्या दिल्या. किती पैसे मिळाले. कुठून पैसे आले, असे प्रश्न विचारून टॉर्चर केलं. आता ईडी कार्यालयात जाऊन कोण बेकायदेशीरपणे बसतात, त्यांची पोलखोल करणार आहे मी! आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही पळून जाता येणार नाही. पुढची पत्रकार परिषद शिवसेना भवन आणि त्यानंतरची पत्रकार परिषद थेट ईडी कार्यालयासमोर घेणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली. हजारो लोकांसमोर मी माहिती फोडणार आहे, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.