'हे तर राज्य गृहखात्यावरील आक्रमण, लक्ष द्या', राऊतांचा राष्ट्रवादीला सल्ला

Sanjay Raut Suggestion to NCP
Sanjay Raut Suggestion to NCPe sakal
Updated on

मुंबई : तपास यंत्रणांच्या राज्यातील वाढत्या कारवाईवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाले आहेत. नाना पटोलेंचे वकील सतीशे उकेंवरील ईडी कारवाईनंतर (ED Raid on Nana Patole Lawyer) आज संजय राऊतांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. आता ईडीला फक्त पाकिटमारीचा तपास करणं बाकी आहे. पण, राज्याचं गृहखातं अधिक बळकट करण्याची गरज आहे. पोलिस यंत्रणा ज्यांच्या अधिकाराखाली येतेय, त्यांनी लक्ष द्यावं, असा सल्ला देखील संजय राऊतांनी दिला.

Sanjay Raut Suggestion to NCP
Video : रिफायनरीबाबत शिवसेना लोकांसोबत - संजय राऊत

ममता बॅनर्जी यांची भूमिका तपास यंत्रणांच्या कारवायाविरोधात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी पाकिटमारीचा तपास करणंच फक्त बाकी आहे. सतीश उके महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर काही आरोप करत आहेत. त्यानंतर ही कारवाई झाली. ही कारवाई व्हायला हरकत नाही. पण, केंद्रीय तपास यंत्रणांनी ही कारवाई केल्यामुळे संशय निर्माण झाला. ईडीचा तपास हा राज्याच्या गृहखात्यावरील आक्रमण आहे. गृहखातं अधिक बळकट करण्याची गरज आहे. महाराष्ट्राची पोलिस यंत्रणा ज्यांच्या अधिकाराखाली येतात त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे, असा अप्रत्यक्ष सल्ला देखील संजय राऊतांनी राष्ट्रवादीला दिला.

'राज्यात अतिरेकी कारवाया' -

सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कारवाई झाली. त्यांनी जमिन लुटली किंवा बळकावली असेल. त्यांनी कोणालातरी धमकी दिली असेल तर महाराष्ट्राचे पोलिस तपास करतील. ईडीने थेट येऊन कारवाई करावी, असे गुन्हे नाहीत. ईडी आणि सीबीआयला दहशत निर्माण करण्यासाठी राज्यात आणलं जातंय. ओढून ताणून पीएमएलएची प्रकरणं उभी केली जातात. विरोधकांनी महाराष्ट्र पोलिसांत तक्रार करायला पाहिजे. अचानक अतिरेकी घुसतात आणि बॉम्ब हल्ले करून निघून जातात. तशाच प्रकारे या अतिरेकी कारवाया केल्या जातात. केंद्र आणि राज्यातील संघर्ष निर्माण झाला तर खूप मोठा होईल, असे संजय राऊत म्हणाले.

'मोदी सरकारने सात वर्षांपासून जनतेला एप्रिल फूल बनवले'

राज्यकर्ते देशातील जनतेला एप्रिल फूल करतात. चार राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर जनतेला एप्रिल फूल बनवलं. इंधनाचे दर वाढवले. एप्रिल फूल गंमतीचा प्रश्न राहिला नाही. तो आता जनता आणि सरकारमधील जीवन मरणाचा प्रश्न आहे. सरकारने आता थापा मारणं बंद करायला पाहिजे. अच्छे दिन येणार, हे एप्रिल फूल आहे. १५ लाख रुपयाच्या नावाखाली गेल्या सात वर्षांपासून एप्रिल फूल बनविण्यात आले. महाराष्ट्र आणि देशात सुडाचं राजकारण करत नाही, हे सांगण हे देखील एप्रिल फूल आहे, असा टोला देखील राऊतांनी भाजपला लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()