आता पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे.
महाराष्ट्राचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस आणखीन तापत चाललं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात आघाडीवर दिसत आहेत. मागील काळात कलेले काही घोटाळे आणि सध्या सुरु असलेला भ्रष्टाचार अशा काही कळीच्या मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी सोमय्यांना (Kirit Somaiya) त्यांनी तीन प्रश्न विचारले असून त्यांची उत्तरे द्याल अशी मला खात्री असल्याचे विधान राऊतांनी केलं आहे.
या ट्वीटमध्ये त्यांनी सोमय्यांच्या कुटुंबियांचा उल्लेख केला असल्याने आता या प्रकरणांला वेगळे वळण लागणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यात राऊत म्हणतात, तुम्हाला इतरांबद्दल जास्त माहित आहे, मग मला आशा आहे, तुम्ही आणखी ३ प्रश्नांची उत्तर देखील द्याल, अशी मला अपेक्षा आहे. ते असे.. एक म्हणजे वेरुर पालघरमधील नीरव डेव्हलपर्समध्ये २६० कोटींची गुंतवणूक कोणी केली? निकॉन ग्रीनव्हिला प्रोजेक्टमध्ये नील आणि मेधा सोमय्या संचालक आहेत का? आणि ईडीच्या (ED) कोणत्या सहसंचालकांनी या बेकायदेशीर प्रकल्पात गुंतवणूक केली आहे?, या तीन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मला सहज तुमच्या कडून मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भाजप (BJP) आणि शिवसेना यांच्यात गेली काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे. नेतेमंडळी एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. भाजपाचे किरीट सोमय्या यांनीही १९ बंगल्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी राऊतांनाही इशारा दिला होता. राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सोमय्यांवर पलटवरा केला. आता मात्र राऊतांच्या नव्या ट्वीटमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरणात खळबळ पसरली आहे. यावर आता सोमय्या काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.