महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार आणि उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने 'तेरा भी मुसेवाला कर दूंगा' असा मेसेज केल्याचा दावा करण्यात आला होता. संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा दावा केला जात आहे. 'जर तू दिल्लीत सापडलास तर तुला एके ४७ उडवून देईन, तू मुसेवाला होशील', असा संजय राऊत यांना मेसेज करण्यात आला होता.
दरम्यान, यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. धमक्या येत असतात पण विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचे सरकार गांभीर्याने घेत नाहीत. संपूर्ण पोलीस यंत्रणा गद्दार गटाला सुरक्षा देण्यात व्यस्थ आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळली आहे. महाराष्ट्रात दंगली होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. आम्हाला आलेल्या धमक्यांची आम्ही माहिती देतो तेव्हा गृहमंत्री चेष्टा करतात, हा स्टंट असल्याचे म्हणतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा - महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार
ठाण्यातील गुंड टोळीच्या म्होरक्याने मला धमकी दिली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचे नाव आहे, मी याबाबत स्पष्ट सांगितले आहे. काल देखील मला धमकी आली मी ते पोलिसांना सांगितले आहे. मात्र विरोधकांना येणाऱ्या धमक्या हे लोक गांभीर्याने घेत नाहीत. पोलीस यंत्रणा फक्त पोलिसांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांच्यावर खोट्या कारवाई करण्यासाठी वापरण्यात येत आहे, असे राऊत म्हणाले.
ज्यांनी सलमान खानला धमकी दिली त्याच गँगकडून मला धमकी आली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असेल तर मी पोलिसांचा आभारी असल्याचे संजय राऊत म्हणाले. या राज्यात सरकार पुरस्कृत दंगली सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा गुंडांच्या मदतीने मला धमकी देतो. याबाबत मी गृहमंत्र्यांना माहिती दिली तर ते म्हणतात हा स्टंट आहे. मग त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) घरात होतो तो स्टंट नाही आहे का?. त्यासाठी तुम्ही एसआयटी तयार करता. लोकांना पकडून आणता. हा तर सर्वात मोठा संस्ट आहे. खर काय आहे हे मला माहित आहे. मात्र मला मर्यादा राखायची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.