"बरोबर ना राऊतसाहेब?"; 'त्या' ट्वीटवरून राणेंचा शिवसेनेला खोचक टोला

"बरोबर ना राऊतसाहेब?"; 'त्या' ट्वीटवरून राणेंचा शिवसेनेला खोचक टोला शिवसेना भवन फोडण्याबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप-सेना आमनेसामने Sanjay Raut trolled by Nitesh Rane regarding allegations of sexual abuse
Sanjay-Raut-Sad
Sanjay-Raut-Sad
Updated on

शिवसेना भवन फोडण्याबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप-सेना आमनेसामने

भाजपच्या माहीम कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम गेल्या आठवड्यात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. आपण आलो की इथे पोलिस खूप येतात. त्यांना वाटतं की आपण शिवसेना भवन फोडणार आहोत. पण वेळ पडली तर आपण तसं नक्कीच करू, असं लाड म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी लाड आणि नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिले. (Sanjay Raut trolled by Nitesh Rane regarding allegations of abuse)

Sanjay-Raut-Sad
BDD प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच सगळ्यांची इच्छा!

नितेश राणे यांच्यावर टीका करताना राऊत यांनी ट्वीट केले. "महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसे समजणार?", असे ट्वीट त्यांनी केले.

त्यावर नितेश राणे यांनीही ट्विट करत त्यांनी उत्तर दिले. "नशामुक्त महाराष्ट्र बरोबर "महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र" हाही कार्यक्रम तातडीने घेतला पाहिजे. जेणेकरून डॉ. स्वप्ना पाटकर यांच्यासारख्या महिलांना न्याय मिळेल! बरोबर ना राऊत साहेब?", असं ट्वीट करत राणे यांनी राऊतांना टोला लगावला. डॉ. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ते आपला छळ करत असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला आहे. त्यावरून राणेंनी राऊतांवर टीका केली.

Sanjay-Raut-Sad
'केवळ मुंबईसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण'

नक्की काय म्हणाले होते प्रसाद लाड?

पुढच्या वेळी आपण कार्यक्रमला कायकर्ते थोडे कमीच आणू. कारण आपण आलो की पोलीस जास्त येतात. फक्त पोलिसांना गणवेश घालून पाठवू नका, असे सांगायला पाहिजे. कारण त्यांना तुमची आमची इतकी भीती आहे की आपण माहीमध्ये जरी आलो तरी त्यांना वाटतं की हे शिवसेना भवन फोडणारच... काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करूच, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.