Rana Vs Raut : ''...तर हे असं आहे''; राऊतांचे आणखी एक ट्वीट

हनुमान चालिसा पठनाच्या इशाऱ्यानंतर नवनीत राणा आणि संजय राऊत यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
Sanjay Raut Navneet Rana
Sanjay Raut Navneet Ranaesakal
Updated on

मुंबई : हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठनाच्या इशाऱ्यानंतर नवनीत राणा (Navneet Rana) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. राणा यांनी संजय राऊत यांच्यावर मागासवर्गीय असल्याने हिन भाषेचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीदेखील मागणी राणा यांनी केली आहे. या सर्वामध्ये राऊत यांनी राणा यांचे जात प्रमाणपत्र (Cast Certificate) कसं खोटं आहे हे सांगणारे ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यातील तक्रारीची प्रत जोडत त्यावर 'असं आहे तर' अशी कॅप्शन दिली आहे. (Sanjay Raut Tweet On Navneet Rana Cast Certificate)

राऊत यांनी जोडलेल्या मुलुंड पोलीस ठाण्यातील 2014 मध्ये दाखल तक्रारीत नवनीत राणा यांनी संगनमत करून मोची जातीचा दाखला केल्याचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, राणा यांनी जातीचाच नव्हेतर, जन्म दाखला, शाळेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म ठिकाण-मुंबई असे इतरही दाखले तयार केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे म्हटले आहे. आरोपी हरभजनसिंग कुंडलेस याने हे दाखले बनावट कागदपत्र तयार करून मिळवले आणि त्या आधारे 2014 मध्ये राणा यांनी खासदार पदाची निवडणूक लढवली. मुलुंड तहसील कार्यालयात खोटे दाखले मिळवले याप्रकरणी नवनीत राणा आणि हरभजनसिंग कुंडलेस यांची जामीनावर सुटका झाल्याचे म्हटले आहे.

Sanjay Raut Navneet Rana
INS विक्रांत प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई HC चा मोठा दिलासा

तक्रारीत नवनीत राणा आणि हरभजनसिंग रामसिंग कुंडलेस यांनी आपसात संगनमत करून मोची जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी 6/8/2012 रोजी ढेकाळे ता. पालघर जि. ठाणे येथे जन्माची नोंद केली. तसेच कुंडलेस याने महापालिकेच्या उच्च प्राथमिक शाळा, बोरीवली प. मुंबई येथील 93 या शाळेचा इयत्ता चौथी पास झाल्याचा आणि 24/8/1960 रोजी शाळा सोडल्याचा दाखला ज्यात जन्म ठिकाण ठाणे तसेच 25/8/1960 या तारखेचा जन्म ठिकाण मुंबई असलेले बनावट दाखले तयार केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तसेच आरोपी हरभजनसिंग रामसिंग कुंडलेस यांनी वरील बनावट कागदपत्रांचा वापर करून स्वतःचा मोची जातीचा दाखला 30/7/2013 रोजी प्राप्त केला. त्यानंतर याची पडताळणी समितीकडून करून घेत याच प्रमाणपत्राच्या आधारावर अमरावती लोकसभा मतदार संघातून खासदार पदासाठीची निवडणूक लढवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.