राऊत, फडणवीस यांच्यात गाजत असलेल्या 'घोडेबाजार' शब्दाला १०० वर्षांचा इतिहास

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झालाय, अशी प्रतिक्रिया दिली होती.
sanjay Raut
sanjay Rautsakal
Updated on

रात्री उशिरा राज्यसभेचा निकाल लागल्या नंतर पदरात पडलेले यश अपयशावर अनेक पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळे प्रतिक्रिया दिल्या. अशीच एक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली की राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झालाय..

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "घोडेबाजारातील काही नेहमीचे घोडे विकले गेले. घोडेबाजारातल्या घोड्यांमुळे महाराष्ट्र सरकारला धोका नाही. घोडे तिकडे असले किंवा इकडे असले, हरभरे टाकले की ते आपोआप येतात."

पण त्यांनी उच्चारलेल्या "घोडेबाजार" या शब्दाचा जन्माला तरी कसा झाला याचीच आज आपण माहिती घेणार आहोत.

sanjay Raut
पाकिस्तानमध्ये वाढली गाढवांची संख्या, कारण ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल

घोडेबाजार या शब्दा नेमका अर्थ काय?

घोडेबाजार (हॉर्स ट्रेडिंग) म्हणजे घोड्यांची विक्री. घोडेबाजार हा शब्द केब्रिज डिक्शनरीत सर्वात आधी आला असे सांगितले जाते.18 व्या शतकात घोड्यांच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडून घोडेबाजार या शब्दाचा वापर करण्यात आला. 1820 च्या दरम्यान व्यापारी उच्च जातीच्या घोड्यांची खरेदी विक्री करत होते.

sanjay Raut
आता एकही पैसा खर्च न करता OTTवर पाहा बातम्या, क्रिकेट, चित्रपट

व्यापारी लोकांना आपले घोडे विकले जावेत आणि आपल्या चांगल्या जातीचे घोडे विकत घेता यावेत .तसेच या खरेदी विक्रीतून चांगला नफा मिळावा म्हणून हे व्यापारी काही ना काही जुगाड करायचे. त्यालाच पुढे घोडेबाजार असे संबोधले जाऊ लागले.

असे म्हटल्या जाते की या काळात व्यापारी घोड्यांना कुठे तरी लपवत असत किंवा कुठे तरी बांधत असत. किंवा योग्य ठिकाणी त्यांची रवानगी करत असत. त्यानंतर चलाकीने अधिकाधिक नफा घेणारा आर्थिक व्यवहार करूनच या घोड्यांची विक्री करत असत. थोडक्यात काय तर आपला घोडा सुरक्षित ठेवुन योग्य वेळी तो बाहेर काढुन आपला फायदा करुन घेत असे.

sanjay Raut
Rajyasabha Election Result: आमच्या विजयाने ते बावचळलेत - फडणवीस

घोडेबाजार या शब्दाला केंब्रिज डिक्शनरीत काय म्हटलंय आहे ?

दोन पक्ष जेव्हा दोघांच्या फायद्यासाठी अनौपचारिक चर्चेत एखादा करार करतात, त्याला घोडेबाजार म्हटलं जातं, असं केंब्रिज डिक्शनरीत नमूद केलं आहे.

राजकारणातील घोडेबाजार कसा चालतो?

आपल्या अवतीभवती ज्या राजकीय घडामोडी चालल्या आहेत त्या पाहुन राजकारणात चालणाऱ्या घोडेबाजार अर्थ कळतोच. जसे की राजकीय समीकरणं बदलू लागले, आघाड्यांचे सरकार येऊ लागल्याने तिथेही अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदार आणि खासदारांची डिमांड वाढली. त्यामुळे अमिषे दाखवून या आमदार आणि खासदारांना आपल्याकडे ओढल्या जाऊ लागले. त्यामुळे या व्यवहारालाही घोडेबाजार असं नाव देण्यात आलं. भारतात यालाच दलबदलू किंवा आयाराम गयारामही म्हटलं जातं. याबाबत देशात कायदाही आहे.

sanjay Raut
चीनला रोखण्याची ताकद फक्त भारतातच; अमेरिकन संरक्षण सचिवांचं विधान

घोडेबाजारात नेमका काय प्रकार चालतो ?

घोडेबाजार अनेक प्रकारचा असतो. पैशाची लालच दाखवणे. पद, प्रतिष्ठा, किंवा एखादं आश्वासन हा प्रकार सुद्धा घोडेबाजारात येतो. अशावेळी धूर्त सौदेबाजी केली जाते. मात्र, शेवटी एखाद्या पॉइंटवर दोन्ही पक्ष मान्य होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.