Eknath Shinde: CM शिंदेंच्या पत्रकार परिषेदला जाणार संजय राऊत, प्रश्नही विचारणार पण...

उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे आहे, त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधणार आहेत
Eknath Shinde Sanjay Raut
Eknath Shinde Sanjay RautSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या (16 सप्टेंबर शनिवारी) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आलेली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा 75 वा सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर 16 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

राज्याच्या राजकारणात या मंत्रिमंडळाची बैठकीची जोरदार चर्चा रंगली आहे. तर या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत. यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तर, बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत आपल्याला संधी दिल्यास एक पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न देखील विचारेन असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Eknath Shinde Sanjay Raut
Bilkis Bano Case: "काही दोषी गुन्हेगारांना विशेषाधिकार मिळतोय"; सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली नाराजी

संजय राऊत काय म्हणालेत?

"उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे आहे, त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलतील. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू, तुम्ही किती खोटं बोलत आहेत ते आम्हाला ऐकायचं आहे. आम्हाला संधी मिळाली तर त्या पत्रकार परिषदेत आम्ही हजर राहू, समोरासमोर प्रश्न विचारु."

"आम्ही देखील पत्रकार आहोत. आम्हाला जर पोलिसांनी अडवलं नाही तर, पत्रकार परिषदेत मी सुद्धा जाईन. तुमच्या हातामध्ये कायद्याच्या बंदुकी आहे, त्यामुळे तुम्ही अडवलं नाही तर मी नक्की जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री यांना पत्रकार म्हणून प्रश्न विचारणार".

Eknath Shinde Sanjay Raut
NCP Crisis: 'लहान तोंडी घेतो मोठा घास...', काका-पुतण्याच्या मनोमिलनासाठी कार्यकर्त्याने पुण्यात लावले बॅनर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.