महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्या शुभेच्छा - खासदार राऊत
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कामात आम्ही कोणताही अडथळा निर्माण करणार नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना राऊतांनी राज्य चालवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं, असा टोलाही लगावला आहे. (Sanjay Raut Raut on Devendra Fadnavis)
यावेळी बोलतना राऊतांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युती झाली असती तर आज फडणवीस मोठ्या पदावर असते. त्यावेळी त्यांनी मोठं मन दाखवायला हवं होतं. मात्र फडणवीस यांची मोठ्या मनाची व्याख्या वेगळी दिसते. शिवसेना फोडण्याचा प्लॅन त्यांनी पूर्ण केला आहे, असा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे. आजही मुख्यमंत्री शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मानत असतील तर याचा आनंद आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (maharashtra politics)
पुढे ते म्हणाले की, जिथे ठाकरे तिथे शिवसेना हे सेनेचं सुत्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच आमचे नेते राहतील. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून राज्याचा कारभार पुढे न्यावा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. पहिल्या दिवसापासून सरकार पडेल असं कोणतही वक्तव्य करणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री शिंदेंना भाजपाने घेतलं असेल तर त्याचा आनंद आहे, असंही ते म्हणाले.
या सरकारच्या कामात कोणताही अडथळा आणणार नाही. एकनाथ शिंदे यांना मिळालेलं पद हे शिवसैनिकाला मिळालं असं म्हणणार नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे उजवे हात असून आता दोघांना एकत्र राज्याचा कारभारी पुढे न्यायचा आहे. जिथे ठाकरे तिथे शिवसेना असणार आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे नेते असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.