Lalit Patil : ललित पाटील प्रकरणावरुन भाजपने उपस्थित केला सुशांतसिंगचा मुद्दा; फरांदे म्हणाल्या...

Lalit Patil
Lalit Patil esakal
Updated on

नाशिकः राज्यामध्ये उघडकीस आलेल्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर ठाकरे गटाने सरकारविरोधात मोहीम उघडली आहे. शुक्रवारी नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मुख्यमंत्र्यांवर टीकास्र सोडलं.

Lalit Patil

काय म्हणाले संजय राऊत?

ड्रग्ज प्रकरणावरुन बोलताना राऊत म्हणाले की, गुजरातमध्ये लाखो-कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज पकडलं जातं पण जो माल पकडला जात नाही तो नाशिकपर्यंत पोहोचतो. सरकारच्या हातात पोलीस यंत्रणा आहे. सत्तेतील दोन मत्र्यांची चौकशी करुन ड्रग्जमधून किती खोके मिळाले, याबाबत माहिती उघड केली पाहिजे. शिवसेनेचं सरकार पाडण्यासाठी ड्रग्ज माफियांकडून पैसे उकळल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

Lalit Patil
ShivSena MLA Disqualification: "सुप्रीम कोर्टात दिलेली कागदपत्रं सादर करा"; शिवसेनेच्या दोन्ही गटांना नार्वेकरांचे आदेश

देवयानी फरांदे म्हणाल्या...

भाजप नेत्या देवयानी फरांदे यांनी संजय राऊतांच्या मोर्चानंतर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर आरोप केले. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलला अटक झाली होती, कोर्टाची कस्टडी असताना त्याला रुग्णालयात का दाखल केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

फरांदे पुढे म्हणाल्या की, संजय राऊत सकाळी उठून काहीतरी बोलत असतात. एकतर ते मनोरुग्ण झालेले आहेत किंवा अंमली पदार्थांचं सेवन करत असावेत. ललित पाटीलचं ठाकरे गटाशी असलेलं कनेक्शन उघड करावं, अशी आमची गृहमंत्र्यांना विनंती आहे. मुळात ललित पाटीलला अटक केल्यामुळे त्यांचा थयथयाट सुरु आहे.

Lalit Patil
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगरक्षकाने रिक्षा चालकाला केली मारहाण; व्हिडीओ व्हायरल

''ललित पाटीलला अटक झाली तेव्हा शिवसेनेने मोर्चा का काढला नाही? नाशिक आणि सोलापूरमध्ये असलेले ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त केल्यामुळे मोर्चा काढला आहे. अफ्टर अॅक्शन ठाकरे गट मोर्चा काढत आहे. शिवसेनेला ठाकरे गटाला जाणारा हप्ता ललित पाटीलकडून बंद झाला काय?'' असा सवाल फरांदेंनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एकाही ड्रग्ज माफियावर कारवाई केली नाही. सुशांतसिंग राजपूतचं प्रकरण अजूनही महाराष्ट्राची जनता विसरलेली नसून तेव्हा ड्रग्स रॅकेट का दाबलं गेलं? प्रकरण का दडपलं गेलं? याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. असं म्हणत फरांदे यांनी अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.