Sanjay Raut : 'नव्या वर्षात बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल' राऊतांचं भाकीत

शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामानाच्या रोखठोक मधून राऊत यांनी मत केलं व्यक्त
Sanjay Raut
Sanjay RautEsakal
Updated on

या नवीन वर्षातही शिंदे फडणवीस सरकार आणि विरोधी पक्ष त्याच आक्रमकतेने एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत. 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे व सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल' असं नवीन भाकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं आहे.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले हा राजकीय बळजोरीचा प्रकार होता. शिवसेनाही फोडण्यात आली. सत्तेच्या गैरवापराचे हे उदाहरण. हे सर्व मावळत्या वर्षात घडले. मावळत्या वर्षात महाराष्ट्राने एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिले. लोकशाही व भारतीय घटनेचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकाकडे ढकलत आहेत.

16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे व सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल. नव्या वर्षात राज्यात व देशात प्रेरणादायी घडावे अशा अपेक्षेत लोक आहेत' हे वर्ष सर्वांसाठी आशादायी ठरेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Sanjay Raut
नववर्षातही शहराला चार-पाच दिवसांआडच पाणी! नियोजन जमलेच नाही; आता ‘अमृत’ची प्रतीक्षा

'आज लोकशाही, स्वातंत्र्य यांची मुंडकी उडवूनच राज्य चालले आहे. नव्या वर्षात तरी देशातील लोकशाही व स्वातंत्र्याची कवचकुंडले मजबूत होवोत. कारण संकुचित मानसिकतेची सर्व लक्षणे सध्याच्या राज्यकर्त्यांत दिसत आहेत. सर्वत्र जात, धर्म आणि त्यावरून तणाव हे चित्र परवडणारे नाही.

हिंदू आणि मुसलमानांत कायमचे वैर हे देशाला नव्या फाळणीकडे ढकलत आहे. जगात कोणीच अमर नाही हे लक्षात घेतले तर मोदी व शहांनी देशात द्वेषाची आणि फाळणीची बीजे रोवू नयेत. राममंदिराचा प्रश्न निकाली निघाला, त्यावर आता मते मिळणार नाहीत. तेव्हा ‘लव्ह जिहाद’च्या मुद्दय़ावर मोर्चे व आंदोलने सुरू केली गेली' असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामानाच्या रोखठोक मधून संजय राऊत यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

Sanjay Raut
Covid 19 : नव्या वर्षात कोरोनाचा धोका वाढला; परदेशातून आलेले 53 प्रवासी पॉझिटिव्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.