Sanjay Shirsat Reply : ...नामर्द आहे हे २५ वर्षांनंतर समजलं का? संजय शिरसाटांना उद्धव ठाकरेंना सवाल

Sanjay Shirsat Strong Reply: अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाला संजय शिरसाट यांनी सणसणीत उत्तर दिलंय.
MLA Sanjay Shirsat
MLA Sanjay Shirsatesakal
Updated on

Uddhav Thackrey News :उद्धव ठाकरे अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाला नामर्दांचा पक्ष आहे, अशी टीका केली होती. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अपात्रतेच्या विषयावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये घेतलेल्या सभेत भाजपवर अनेक आरोप केले होते.

'भाजप नामर्द पक्ष आहे' उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शिरसाट म्हणाले की, " हे २५ वर्षांनंतर समजल का ? २५ वर्ष ज्यांच्यासोबत आपण युतीमध्ये राहिलो, सत्ता भोगली. एकमेकांच्याबरोबर जेवणावळी काढल्या, एकमेकांना नमस्कार केले, एका व्यासपीठावर राहिले, २५ वर्षांनंतर त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणं योग्य नाहीये.

उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये घेतलेल्या सभेत भाजपवर अनेक आरोप केले होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी अडीच वर्ष मराहाष्ट्र घरी राहून सांभाळून दाखवला. मी घरी राहीलो पण कुणाचं घर नाही फोडलं"

MLA Sanjay Shirsat
Sanjay Raut:"बाई परत लोकसभेत जातील ? त्यांना बजरंग बली धडा शिकवणार.." संजय राऊत कडाडले

यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत, शिंदे गटाच्या बंडाच्या मागे उद्धव ठाकरेंचं घरी राहणं असल्याचं कारणं त्यांनी स्पष्ट केलं. शिरसाट यांनी शरद पवारांचे उदाहरण देत ठाकरेंना टोमणा देखील मारला.

यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, "घरात बसतं होते हाच मोठा त्रास होता. ते जर घरात बसले नसते तर आमदार नाराज झाले नसते. आमदार नाराज झाले नसते, तर त्यांनी उठाव केला नसता. उठाव केला नसता, तर पक्षाची अशी वाट लागली नसती. म्हणून घरात बसंण किती घातक आहे. मग एकीकडे आपण म्हणतो ८३ वर्षांचे शरद पवार दुसऱ्या दिवशी सभेला गेले. जर ते असं करु शकतात, तर आपण अडीच वर्ष घरात बसून काय केलं? हा प्रश्न सुद्धा सर्वसामन्य जनता आपल्याला विचारतीये."

MLA Sanjay Shirsat
Uddhav Thackeray : त्रिशुळ कसला, हे सरकार एक फुल दोन हाफ! उद्धव ठाकरेंचा दिग्रसमधून जोरदार हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.