Sanjay Shirsath On Ajit Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आता विरोधीपक्षनेते असणारे अजित दादा हे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणारे व्यक्तिमत्व आहे. सत्ता असो किंवा नसो पण दादांची चर्चा ही होतच असते. याचे कारण त्यांचे बिनधास्त व्यक्तिमत्व. यापूर्वी राज्याच्या राजकारणातील कित्येक बड्या बड्या व्यक्तिंनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेलं मत खूप काही सांगून जाते.
गेल्या काही दिवसांपासून अजित दादा त्यांच्याच एका भाषणामुळे चर्चेत आले. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन होता. त्यात दादा जे बोलले त्याच्या कित्येक बातम्या समोर आल्या. त्या सोशल मीडियावर व्हायरलही झाल्या. त्या भाषणाच्या व्हिडिओ क्लिप्स नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेऊ लागल्या. दादांनी आता मला विरोधीपक्ष नेते पदातून मुक्त करा.
अशी विनंतीवजा मागणी त्या भाषणातून केली होती. दादांचे ते भाषण टोमणे, चिमटे अशा स्वरुपाचे असले तरी एकूण त्यांच्या आगामी वाटचालीविषयी खूप काही सांगून जाणारे होते.
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाचे ते भाषण झाल्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण येऊ लागले. राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काही अनबन आहे का, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत काही कलह आहेत का, आणि दादा काय महत्वाचा निर्णय घेणार का असे प्रश्नही सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उपस्थित केले. त्यात ज्यांनी दादांसोबत गेल्या काही वर्षांपासून काम केले आहे त्यांच्या प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत.
आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित दादांविषयी दिलेली प्रतिक्रिया दादांच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगून जाणारी आहे. सध्या फेसबूकवर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात शिरसाट यांनी दादांविषयी सांगितलेली गोष्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
शिरसाट त्या व्हिडिओमध्ये म्हणतात, अजित दादा जे पटकन कुणाला बोलतात ते मनापासून बोलतात. आणि जे प्रेम करतात ते देखील मनापासून करतात. मी गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना पाहतो आहे. विरोधीपक्ष नेतेपदी जे टॉपचे नेते आहेत त्यात त्यांचे नाव आहे याला कारण त्यांचा स्वभाव आहे. आजही अजित दादांना अख्ख मंत्रालय घाबरतं. अशा शब्दांत शिरसाट यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.