Sushma Andhare : अंधारेंवरील अर्वाच्च टीकेवर शिरसाट यांचं स्पष्टीकरण म्हणाले, मी तर...

Sushma Andhare and Sanjay Shirsat
Sushma Andhare and Sanjay Shirsat
Updated on

छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यांवर अर्वाच्च भाषेत टीका केली होती. यावरुन आता राजकारण तापले असून सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्यावर आता शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे.

Sushma Andhare and Sanjay Shirsat
Sushma Andhare: सुषमा अंधारेंची महिला आयोगात धाव; शिरसाटांना वक्तव्य भोवणार

शिरसाट म्हणाले की, मला आतापर्यंत कळलं नाही की, माझ्या भाषणातील कोणतं वाक्य आहे जे खालच्या पातळीचं आहे. ज्यामुळे एवढं वादळ उठवलं, पण त्यात काहीच नाही. मी अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांना विचारलं की, तुमच्याकडे सभा होणार आहेत, तुम्ही काय लफडे केले. शिवाय मी त्यांच्या सुभेदारी गेस्टहाऊसमध्ये राहण्याबाबतच्या मुद्दावर बोललं.

दरम्यान, मी काय लफडे आहेत, असं मी दोन मंत्र्यांना विचारलं. लफडे याचा अर्थ आर्थिक होतो. त्यामुळे तुम्हाला त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय, असा प्रतिप्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला. तसेच मला महिला आयोगाने खुशाल नोटीस पाठवावी, असं आव्हानही शिरसाट यांनी दिलं.

Sushma Andhare and Sanjay Shirsat
Gunaratna Sadavarte : 'डंके की चोट पे' म्हणत नाचणाऱ्या सदावर्तेंची वकिली धोक्यात, सनदच रद्द

'शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला युवाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. 26 मार्च २०२३ रोजी छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()