'मुंबईच्या छातीवर उभा राहून विकास, भाजपाने भूमिका स्पष्ट करावी'

भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी मुंबईविषयी त्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे - राऊत
Sanjay-Raut
Sanjay-RauteSakal
Updated on
Summary

भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी मुंबईविषयी त्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे - राऊत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प सादर झाला असून आता विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आता या अर्थसंकल्पावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपा नेते आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. आज ते दिल्लीत बोलत होते.

Sanjay-Raut
नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट; पण मृतांची संख्या वाढली

ते म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तिचा विकास होणे हे अनेकांना पहावत नाही का असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे. देशातील महत्वाच्या शहरांचा विकास व्हावा अशी आमची भूमिका आहे. तरच देशाचा विकास होईल. मात्र यावेळी मुंबईची धुळधान करणं हे योग्य नाही. काहींना महाराष्ट्राचा (Maharahstra) विकास झालेला बघवतं नाही आहे. महाराष्ट्राच्या छातीवर उभा राहून राज्याचा खिसा कापत आहात ते बंद करा. पण प्रत्येक वेळेला महाराष्ट्रावर अन्याय का ? भारतीय जनता पक्षातील नेत्याची मुंबईविषयी (Mumbai) काय भूमिका करावी, असेही त्यांनी ,स्पष्ट केले आहे. याआधीही कधीच काँग्रेसच्या राजवटीत असं झालं नाही, त्यापेक्षाही जास्त मुंबईला लुबाडण्याचा, ओरबाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. महत्त्वाचे उद्योग पळवण्याचाच हा अर्थसंकल्प (Budget 2022) असल्याचे ते म्हणाले आहेत. मुंबईतील योजना गाडण्याचा प्रयत्न असून मुंबईचा खिसा कापून इतरांचा विकास करणे कितपत योग्य आहे हे सांगावे.

पुढे ते म्हणाले, भाजपासह इतरही राजकीय पक्षांना मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे. त्याला शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावून घ्यायची आहे. परंतु मुंबईची प्रतिष्ठा ही शिवसेनेमुळे राहिली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त वरवरचा देखावा निर्माण केला आहे. सरकारच्या दृष्टीला पाच-सहा उद्योगपती हेच सर्वसामान्य जनता आहे. ते सरकार चालवतात. आणि त्याच मध्यमवर्गीयांना चार किंवा पाचजणांना अधिक श्रीमंत कसे करता येईल, यासाठी सरकारच्या बजेट असते अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Sanjay-Raut
समीर वानखेडेंच्या हॉटेल-बारला दिलेला परवाना रद्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.