मुंबई : २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देश महात्मा गांधींची जयंती साजरी करतो. हा दिवस स्वच्छतेसाठीही ओळखला जातो. कारण काही वर्षांपूर्वी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली होती.
पंतप्रधान मोदी आणि महात्मा गांधी यांच्याही आधी एका व्यक्तिमत्त्वाने स्वच्छतेचा झेंडा रोवला होता. पण आता बहुतेक लोक त्यांचे नाव विसरले आहेत. मध्ययुगीन भारतातील संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेबाबत आवाज उठवला होता. (sant gadagebaba gramswachhta abhiyan)
लोक त्यांना गाडगेबाबा या नावानेही ओळखतात. आज त्यांची जयंती आहे. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. हेही वाचा - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ !
आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय रजक यांच्या मते, संत गाडगे हे भारतातील पहिली व्यक्ती होते ज्यांनी लोकांना स्वच्छतेबद्दल जागरुक केले आणि त्याचे फायदे सांगितले.
गाडगेबाबा देशभरात फिरून लोकांना स्वच्छतेबाबत जागरूक करायचे आणि स्वतः परिसराची स्वच्छता करायचे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आजूबाजूचे वातावरण कसे स्वच्छ ठेवता येईल हे त्यांनी लोकांना सांगितले.
महाराष्ट्र शासन दरवर्षी संत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वच्छता पुरस्कार देते. महाराष्ट्र सरकारने 2000-01 मध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानात स्वच्छ गावांचा गौरव करण्यात आला आहे.
यासोबतच भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता आणि पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही सुरू केला आहे.
अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यांमुळे बरेचसे आजार होतात. म्हणूनच २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्य शासनाने सुरू केले.
लोकसहभागामुळे ही एक लोकचळवळ म्हणून नावारुपास आली. यासाठी कोट्यवधी रुपयांची विकास कामे करण्यात आली. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, अन्न आणि घराची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन , मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यांसारख्या विषयांवर काम करण्यात आले.
विद्यार्थी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच, महिला भगिनी सर्वांनी या योजनेत भरीव योगदान तर दिलेच परंतु गावाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला गतीही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.