पुणे - ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १६ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर २८ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.