'या' सहकारी संस्थांना चिंता, 54 कोटी 40 लाख रुपये कसे परत मिळणार ?

'या' सहकारी संस्थांना चिंता, 54 कोटी 40 लाख रुपये कसे परत मिळणार ?
Updated on

कऱ्हाड ः जिल्ह्यात दररोज गाईचे 12 ते 13 लाख, तर म्हशीच्या दुधाचे तीन ते साडेतीन लाख लिटर संकलन होते. त्यातच लॉकडाउनमुळे हॉटेल, बेकरी, आईस्क्रीमसह अन्य व्यवसाय, उद्योग बंद राहिले. त्यामुळे शिल्लक राहणाऱ्या दुधाचे करायचे काय, हा प्रश्न दूध डेअरींपुढे होता. त्यांनी भविष्यातील मार्केट खुले झाल्यावर दूध पावडरला मागणी होईल, या हेतूने जिल्ह्यातील दूध संस्थांनी तीन हजार टन दूध पावडर तयार केली आहे. तीन महिन्यांपासून ती जशीच्या तशी पडून आहे. त्यात जागतिक बाजारपेठेचे मार्केटही खुले नाही. त्यामुळे त्या तयार झालेल्या पावडरचे करायचे काय, यांसह त्यासाठी घातलेले 54 कोटी 40 लाख रुपये कसे परत मिळणार, हा मोठा प्रश्न सध्या संबंधित दूध संघांसमोर आहे.
दुधाचे करायचे काय...ते फोडताहेत टाहाे 

सध्या जिल्ह्यात सहा सहकारी दूध संघ तर मल्टीस्टेट सहकारी दूध संघ पाच आहेत. त्या तुलनेत खासगी दूध संस्था 71 आहेत. जिल्ह्यात 356 सहकारी दूध डेअरी आहेत. तर स्पर्धेमुळे प्रत्येक गावात एक ते दोन खासगी संघांची दूध केंद्रे आहेत. त्याव्दारे जिल्ह्यात दररोज गाईचे 12 ते 13 लाख लिटर तर म्हशीचे तीन ते साडेतीन लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठ दिवसांत कोरोनामुळे सरकारला लॉकडाउन करावे लागले. त्यामुळे सर्व व्यवहार, उद्योग, व्यवसाय ठप्प झाले. परिणामी दुधाची मागणीही झपाट्याने घटली. त्यादरम्यान दूध संस्थांनी शेतकऱ्यांकडून दूध घेणे सुरूच ठेवले होते. त्यांच्याकडे अतिरिक्त दूध साठून राहायला लागले. लॉकडाउनमुळे हॉटेल, बेकरी, आईस्क्रीमसह अन्य व्यवसाय, उद्योग बंद राहिले. त्यामुळे शिल्लक राहणाऱ्या दुधाचे करायचे काय, हा प्रश्न होता. त्यांनी भविष्यात मार्केट खुले झाल्यावर दूध पावडरला मागणी होईल, या हेतूने दुधापासून तीन हजार टन पावडरची निर्मिती केली. ती गेल्या तीन महिन्यांपासून पडून आहे. त्यात जागतिक बाजारपेठेचे मार्केटही खुले नाही. त्यामुळे त्या तयार झालेल्या पावडरचे करायचे काय, यासह त्यासाठी घातलेले 54 कोटी 40 लाख रुपये कशातून उभे करायचे, हा प्रश्‍न सध्या संघांपुढे आहे. पावडला लवकर मागणी न झाल्यास ती वाया जाण्याचाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संघ चालकांचेही धाबे दणाणले आहेत. 

Coronavirus : विश्‍वासार्हतेमुळे वृत्तपत्रांनाच वाचकांची पसंती

होम क्वारंटाइनच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा केल्याने या गावचा सरपंच अडचणीत

जिल्ह्यातील उपलब्ध पावडर अशी... 

कोळकी (ता. फलटण) येथील गोविंद मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्‍टस या संस्थेने उच्चांकी एक हजार 742 टन, तर निंभोरे (ता. फलटण) येथील स्वराज इंडिया इंडस्ट्रीज या संस्थेने 197 टन दूध पावडरची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील इतरही सहकारी व खासगी दूध संघांनी एक हजार 61 टन दूध पावडरची निर्मिती केली आहे. अशी जिल्ह्यात सध्या तीन हजार टन दूध पावडर पडून आहे. पावडरचा बाजारपेठेतील सरासरी दर 180 रुपये किलो आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील संघांकडे 54 कोटी 40 लाखांची पावडर पडून आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

कचरा टाकणारा कळवा, हजार रुपये बक्षीस मिळवा, या ग्रामपंचायतींची नामी शक्कल

काय सांगता! नाही नाही म्हणता...48 कोटी जमा झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.