देशभर भाजपाला रोखण्यासाठी 'कोल्हापूर फाॅर्म्युला' गरजेचा : सतेज पाटील

. योग्य प्लॅनिंग केले तर विजय नक्की होतो हे आम्ही दाखवून दिलं-सतेज पाटील
satej patil, chandrkant patil
satej patil, chandrkant patilesakal
Updated on

कोल्हापूर : भाजपाच्या (BJP) विकारी प्रचाराला जनतेने विचाराने उत्तर दिले आहे. ही शाहू (Shahu) महाराजांची भूमि आहे येथे पोलरायझेशन चालत नाही हे दाखवून दिले आहे. मायक्रो प्लॅनिंग जर केल तर नक्कीच भाजपाचा पराभव होऊ शकतो हे २०१९ च्या निवडणूकीत आम्ही दाखवून दिले आहे. याचबरोबर उत्तरच्या निवडणूकीतही दाखवून दिले असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी उत्तरच्या विजयानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

satej patil, chandrkant patil
Photo l 'मविआ'ची सरशी; सतेज पाटील ठरले किंगमेकर

पुढे ते म्हणाले, भाजपाला थांबवण्यासाठी कोल्हापूर निवडणूकीचा हा फाॅर्म्यूला देशभर घेऊन जाणे गरजेचं असल्याचेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर शिवसेना अॅक्टीव्ह झाली होती. काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप अशा सर्वंच पक्षाने ताकदीने मदत केली. आज जो विजय झाला तो संघटीत विजय आहे. यावेळी सर्वांचे आभार सतेज पाटील यांनी मानले. योग्य प्लॅनिंग केले तर विजय नक्की होतो हे आम्ही दाखवून दिले आहे असेही ते म्हणाले.

Summary

भाजपाला थांबवण्यासाठी कोल्हापूर निवडणूकीचा हा फाॅर्म्यूला देशभर घेऊन जाणे गरजेचं.

satej patil, chandrkant patil
'आमचे नाना लढले तर तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल?'

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, चंद्रकांतदादांना २०१९ ला उत्तर दिलं होतं. या निवडणूकीत गुंडांची फौज घेऊन ते आले होते. पुण्यातील गुंड त्यांच्या गाडीतून फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पैशाचा वारेमाप वापर केला. कोल्हापूरला विकत घेण्याचा प्रयत्न, महिलांना बदमान करण्याचा प्रयत्न, माझी वैयक्तिक बदमानीचा प्रय़त्न केला. मात्र कोल्हापूरकरांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. त्यांनी जे पोलरायझेशनचे मुद्दे उभे केले त्याला आडवे करण्याचे काम कोल्हापूरकरांनी केलं आहे असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.