महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास हरपला

पुरोगामी चळवळीचे नेतृत्व हरपले; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
satej patil, hasan mushrif, raju shetti
satej patil, hasan mushrif, raju shettiEsakal
Updated on

कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, प्रा. डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर समाजमाध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्याच बरोबर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)यांनी ही श्रद्धांजली वाहिली आहे.

शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले. समाजाच्या हितासाठी अखेपर्यंत सरांनी रस्त्यावर उतरून लढाई केली. कामगार-शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे, आंदोलने करत न्याय भूमिका घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन, सीमा प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर लढा उभारणारे अभ्यासू आणि वैचारिक, कणखर व्यक्तिमत्व आमच्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळाले हे त्यांनी कृतीतून करून दाखविले. सर आज आमच्यात नाहीत ही भावना वेदनादायी आहे. असे दु;ख व्यक्त करत सतेज पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

satej patil, hasan mushrif, raju shetti
एनडी पाटील यांचे 'रयत'साठीचे योगदान कधीच पुसलं न जाणारं - शरद पवार

आयुष्यभर कष्टकरी कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांचे निधन अत्यंत दुःखदायक आहे. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचं नेतृत्व हरपला आहे. अशी प्रतिक्रिया ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. त्यांनी इस्पितळात येऊन एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे आज दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्राध्यापक डॉक्टर एन. डी. पाटील यांनी आयुष्यभर इतरांसाठी संघर्ष केला. कामगार शेतकरी कष्टकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी आंदोलने केली. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर ते आंदोलनासाठी उतरले होते. राजकीय महत्त्व कशासाठी त्यांनी कधीही आपल्या विचारांची आणि पक्षाची तडजोड केली नाही. स्वार्थासाठी पक्ष विचार बदलणार यांच्या डोळ्यात त्यांनी आपल्या व्यवहारातून झणझणीत अंजन घातले. त्यांच्या निधनाने एक मोठे नेतृत्व हरपले आहे.

ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील आम्हाला सोडून गेले हा फार मोठा धक्का आहे. महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराने काम करणाऱ्या सामाजिक चळवळीतील काम करणाऱ्यांचा आधारवड हरपला आहे.आमचे सर्वांचे ते विश्वाचार्य होते. चालत बोलत विद्यापीठ सोडून गेलं. रायगड सेज कायदे विरोधक आंदोलन, कोल्हापूर टोल नाका आंदोनलन. विजदर आंदोलन, सीमाप्रश्न, पाण्याचे आंदोलन, ऊस आंदोलनामध्ये ते आग्रभागी होते. रस्त्यावर उतरुन न्या मिळवून देणे ही त्यांची ख्याती होती. कार्यकर्ता चुकला तर खडेबोल सुनावणारा आमचा नेता हरपला.याचे अतिव दु;ख आम्हाला आहे.त्यांनी जी पायवाट मळवली आहे त्या वाटेवरुन जाण हीच त्यांना खरी श्रध्दांजली आहे. असे दु;ख खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()