Blood Bank : राज्यात नवीन 35 रक्तपेढ्यांना मंजुरी देण्याचा सरकारचा घाट

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने विविध कामांना मंजूरी देण्याचा सपाटा लावला आहे.
Blood-Bank
Blood-Banksakal
Updated on

पंढरपूर - आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने विविध कामांना मंजूरी देण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये आता राज्यात नवीन 35 रक्तपेढ्यांना मंजूरी देण्याचा घाट आरोग्य विभागाने घातल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्यविभागाने नियमबाह्यपणे नवीन रक्त पेढ्यांना मंजूरी देऊ नये, अशी मागणी देखील या निमित्ताने पुढे आली आहे.

तसे झाल्यास या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते वैभव राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्त पेढ्या चालवल्या जातात. सध्या राज्यात 376 रक्तपेढ्या सुरु आहेत. या रक्त पेढ्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मागणीनुसार रक्त पुरवठा केला जातो. शिवाय रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्त संकलन देखील केले जाते.

अशातच आता काही सामाजिक संस्थांनी नवीन रक्त संकलन केंद्र सुरु करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे. यामध्ये राज्यभरातून जवळपास 35 नवीन प्रस्ताव राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे मंजूरीसाठी दाखल झाले आहेत. यामध्ये पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक प्रस्ताव दाखल असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.

नवीन रक्तपेढी सुरु करण्यासाठी संबंधी संस्था ही शासन मान्य असावी, शिवाय संबंधी संस्थेकडे 200 पेक्षा अधिक बेडचे हाॅस्पिटल असावे ही अट घालण्यात आली आहे. परंतु अनेक संस्थांकडे दोन पेक्षा अधिक बेडचे हाॅस्पिटल नसताना देखील नवीन रक्तपेढीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची तक्रार वैभव राऊत यांनी केली आहे.

सरकारने नियमबाह्यपणे नवीन रक्तपेढ्यांना रक्त संकलनासाठी परवानगी दिली तर या निर्णाया विरोधात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन जाईल असा इशारा वैभव राऊत यांनी दिला आहे.

राज्यात सध्या 376 रक्त पेढ्या सुरु आहेत.यावर्षी नवीन रक्त संकलन केंद्रे सुरु करण्यासाठी राज्यातून सुमारे 35 नवीन प्रस्ताव राज्य रक्त संक्रमण परिषदेकेडे दाखल झाले आहेत. त्या सर्व प्रस्ताव तपासणीचे काम सुरु आहे. तपासणीमध्ये योग्य असलेले प्रस्ताव पुढे मंजूरीसाठी पाठवले जाणार आहेत.

- महेंद्र केंद्रे, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई

नवीन रक्तपेढी सुरु करण्यासाठी मी सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. तो नामंजूर केला आहे. परंतु सध्या नियमबाह्यपणे अनेक संस्थांना रक्त संकलन सुरु करण्यास परवाणगी देण्याचा आरोग्य विभागाने घाट घातला आहे. शासनाने दिलेल्या नियमानुसारच नवीन रक्त संकलन केंद्राना परवाणगी द्यावी, नियमबाह्यपणे परवाणगी दिल्यास सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाईल.

- वैभव राऊत, सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.