Satish Uke : गावगुंड मोदींपासून ते भाजप नेत्यांविरोधातले याचिकाकर्ते!

वकील सतीश उके यांच्या घरी आज ईडीची धाड पडली.
Satish Uke
Satish UkeTeam eSakal
Updated on

राज्यभरातील सत्ताधारी पक्षातील नेते, त्यांचे कुटुंबीय आणि नीकटवर्तीय अशा अनेकांवर आजपर्यंत ईडीचे छापे पडले आहेत. त्यातच आज सकाळी अचानक नागपुरात ईडीने कारवाई केली. काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील अशी ओळख असणाऱ्या अॅडव्होकेट सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर आज सकाळी सत्कवसुली संचलनायाने कारावाई केली. त्यामुळे हे नाव सध्या चर्चेत आलं आहे.

Satish Uke
'तोंड बंद करण्यासाठी...' ईडीची छापेमारी सुरू होताच नाना पटोलेंचं ट्वीट

सतीश उके यांनी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनेकदा न्यायालयात धाव घेतली असून, ते नाना पटोले यांचे काही खटले लढत आहेत. आज त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी थेट आरोप केला की, हे सर्व फडणवीसांविरोधात न्यायालयातील लढ्यामुळे सुरु आहे.

Satish Uke
Petrol-Diesel दरवाढीबद्दल प्रश्न विचारताच बाबा राम देव संतापले

गेल्या काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मोदी हे नाव संबोधून त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती, त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली. त्यावेळी नाना पटोलेंनी आपलं हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी नसून, गावगुंड असलेल्या एका मोदीसाठी असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्या कथित गावगुंड मोदींना माध्यमांसमोर आणण्याचं काम सतीश उके यांनीच केलं होतं.

Satish Uke
'कामावर या, अन्यथा...' एसटी कर्मचाऱ्यांसाठी आज शेवटचा अल्टिमेटम

सतीश उके यांनी आणखी एका महत्वाच्या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ती म्हणजे जज लोयांचं मृत्यू प्रकरण. सतीश उके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर नोव्हेंबर २०१८ मध्ये नवीन फौजदारी रिट याचिका दाखल केली असून न्यायाधीश बी.एच. लोया यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. त्यांच्या २०९ पानांच्या फौजदारी रिट याचिकेत उके यांनी आपल्या पत्नीच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे.

सतीश उके यांनी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर आरोप करत त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. आज त्यांच्या परिवारातील लोकांनी सांगितलं की, याच कारणामुळे त्यांच्यावर ही कारवाई होतेय. तर काँग्रेससह विरोधी पक्षांनी देखील हाच आरोप केला आहे. तसंच त्यांच्याकडे असलेल्या एका महत्वाच्या प्रकरणावर येणाऱ्या काही दिवसांत निकाल लागणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचा आरोपही त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.