Satyajeet Tambe : बंडखोर सत्यजीत तांबेंची काँग्रेसकडून हकालपट्टी

अपक्ष उमेदवाराने कोणाला पाठिंबा मागायचा आणि कोणाला मागायचा नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
Satyajeet Tambe
Satyajeet Tambeesakal
Updated on

Satyajeet Tambe : सत्याजीत तांबेंच्या बंडखोरीनंतर नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला होता. त्यानंतर काँग्रेसकडून सत्यजीत तांबेंवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

Satyajeet Tambe
Shubhangi Patil Profile : सत्यजीत तांबेंची धडधड वाढवणाऱ्या शुभांगी पाटील कोण?

त्यानंतर आज मविआने नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि नागपूरमध्ये सुधाकर आडबालेंना पाठिंबा देण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ते मविआच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe : तांबेंची उमेदवारी आणि विचारधारेची चर्चा

दरम्यान, बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मविआचे पाचही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

अपक्ष उमेदवाराने कोणाला पाठिंबा मागायचा आणि कोणाला मागायचा नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सत्यजीत तांबेंना आता भाजप पाठिंबा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Satyajeet Tambe
Pune News : पुण्यातील प्रसिद्ध मॉलमध्ये मोठ्या अफरातफरीचा प्रकार; तपास सुरू

विधानपरिषद निवडणूक मविआ एकत्रपणे लढणार असल्याचेही यावेळी पटोलेंनी यावेळी स्पष्ट केले. तसेच दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोपही पटोलेंनी यावेळी केला.

राज्याची जनताच भाजपला धडा शिकवेल असे म्हणत थोरातांशी आम्ही संपर्कात असल्याचे ते म्हणाले.

Satyajeet Tambe
Narendra Modi : मला मोदींची काळजी वाटते; मोदींच्या मुंबई दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मोदींच्या मुंबई दौऱ्याबाबत पटोले म्हणाले की, देशाच्या पंतप्रधांनी गटाराचं उद्घाटन करणे म्हणजे भाजप एकप्रकारे प्रधानमंत्री पदाच्या गरिमेला धक्का लावत आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून मोदींनी भाजपचा प्रचार करण्याशिवाय काहीचं केले नाही असा घणाघात पटोलेंनी केला. त्यामुळे मोदींनी ग्रामपंचायत, महापालिका किंवा इतर गोष्टींसाठी यावं हा त्यांचा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.