मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघातून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याप्रकरणी सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या हायकमांडकडून तशा सूचना देण्यात आल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. कालच त्यांचे वडील सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला दिल्या आहेत. त्यामुळं सत्यजीत तांबे यांच्या अडचणी वाढणार आहेत. पण दुसरीकडं भाजपही त्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. जोपर्यंत तांबे यांच्याकडून अधिकृतरित्या पाठिंबा मागितला जात नाही तोपर्यंत भाजप त्यांना पाठिंबा देणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी म्हटलं होतं.
सत्यजीत तांबे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे, असा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं असा अहवाल केंद्रीय समितीकडं दिला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता आपला मुलगा सत्यजीत तांबे यांच्यासाठी पक्षाची चर्चा न करताच माघार घेतली होती. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. सत्यजीत तांबे हे युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळं काँग्रेसनं उमदेवारी दिलेली नसतानाही त्यांनी अर्ज दाखल केल्यानं काँग्रेसवर निमुष्की ओढवली. याच कारणामुळं दोघा तांबे पिता-पुत्रावर काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.