Sharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणात 'ते' आरोप भोवणार! सुप्रिया सुळे, रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा

 Saurabh Pimpalkar to sue Supriya Sule Rohit Pawar Amol Mitkari and Jitendra Awhad for defamation in Sharad Pawar death threat case
Saurabh Pimpalkar to sue Supriya Sule Rohit Pawar Amol Mitkari and Jitendra Awhad for defamation in Sharad Pawar death threat case
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तुमचा दाभोळकर होईल अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणी पुण्यातून एकाला अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात संशयित म्हणून नाव पुढे आलेल्या सौरभ पिंपळकर यांनी या प्रकरणात पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार धमकी प्रकरणात आरोप झालेल्या सौरभ पिंपळकर यांनी सात दिवसांनंतर माध्यमासमोर येत धमकी दिल्याचे आरोप फेटाळले आहेत. त्या ट्विटशी आपला काही संबंध नसल्याचे सांगत आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी साम टिव्हीला सांगितले. शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून धमीकी देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, आता त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचे पिंपळकर यांनी सांगितले आहे.

 Saurabh Pimpalkar to sue Supriya Sule Rohit Pawar Amol Mitkari and Jitendra Awhad for defamation in Sharad Pawar death threat case
Ajit Pawar : सरकार टिकवण्यााठी ते ४० आमदार… ; अजित पवारांचे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गंभीर आरोप

सौरभ पिंपळकरची पहिली प्रतिक्रिया..

प्रसारमाध्यमामध्ये बातमी दाखवण्यात आली की. तुमचा दाभोळकर होईल अशी धमकी माझ्या नावाने दिली गेली असं दाखवण्यात आलं होतं. त्या धमकीचा आणि माझ्या बोलण्याचा काही संबंध नव्हता. त्यांनी माझी प्रोफाइल आणि ती पोस्ट दाखवली. यामुळे माझं नाव समजमध्यामांमध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पोस्टशी माझा काहीएक संबंध नाही. पण माझं प्रोफाइल, माझं नाव त्याच्याशी निगडीत दाखवून आरोप केले गेले, त्यामुळे मागील काही दिवसांत माला आणि माझ्या परिवाराला पचंड मनस्ताप झाला असे सौरभ पिंपळकर यांनी सांगितले.

 Saurabh Pimpalkar to sue Supriya Sule Rohit Pawar Amol Mitkari and Jitendra Awhad for defamation in Sharad Pawar death threat case
Indurikar Maharaj : 'ते' वक्तव्य इंदुरीकर महाराजांना भोवलं! औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

चार नेत्यांवर करणार मानहानीचा दावा

कुटुंबाला त्रास सहन करावा लागल्याने याबद्दल सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मानहानिचा दावा करणार आहे असे सौरभ पिंपळकर यांनी सांगितलं.

शरद पवारांनी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकांउटवरून तुझा दाभोळकर होईल अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या ट्विटर अकाउंटच्या बायोमध्ये मी भाजपचा कार्यकर्ता आहे असे देखील सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.