आज सावरकर राष्ट्रीय मुद्दा नाहीत...शरद पवारांचं विधान

शरद पवार यांनी पुन्हा राहुल गांधी यांचे कान टोचले
Savarkar is not a national issue Sharad Pawar defends Rahul Gandhi)
Savarkar is not a national issue Sharad Pawar defends Rahul Gandhi)
Updated on

मी सावरकर नव्हे गांधी आहे, गांधी कधीच माफी मागत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटल्याने देशासह राज्यभरात घमसान माजले आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आपली भूमिका बदलणार का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. (Savarkar is not a national issue Sharad Pawar defends Rahul Gandhi)

नागपूर प्रेस क्लबमध्ये शरद पवार बोलत होते. भाजप राहुल गांधींवर सावरकरांचा 'अपमान' केल्याचा आरोप करत आहे. त्यांच्या सन्मानार्थ भाजप सावरकर गौरव यात्राही काढत आहे. यासंदर्भात पवारांना विचारले असता, सध्या सत्तेत असलेले देशाला कुठे घेऊन जात आहेत, यावर चिंतन करण्याची गरज आहे, असे मी सुचवेन. असा खोचक वक्तव्य पवार यांनी यावेळी केलं.

तसेच, सावरकर हा राष्ट्रीय प्रश्न राहिलेला नाही, तो भूतकाळाचा विषय झाला आहे. सावरकरांबद्दल आपण काही गोष्टी बोलल्या आहेत, पण त्या वैयक्तिक नाहीत. मी हिंदू महासभेच्या विरोधात होतो, पण दुसरी बाजूही आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेल्या बलिदानाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. असे सांगत, देशात सामान्य लोकांच्या चिंतेचे मोठे प्रश्न असतात तेव्हा सावरकरांच्या मुद्यावर जोर देण्याची गरज नाही. असही पवार म्हणाले.

सावरकरांनी रत्नागिरीत घर बांधले होते आणि त्यासमोर छोटेसे मंदिरही बांधले होते. सावरकरांनी मंदिरातील पूजेची जबाबदारी वाल्मिकी समाजातील व्यक्तीकडे दिली होती. माझा विश्वास आहे की ही एक अतिशय प्रगतीशील गोष्ट होती. असा किस्साही पवारांनी यावेळी सांगितला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()