MPSC Student Protest : CM शिंदे दुसऱ्या कामात व्यस्त; शरद पवार, MPSC विद्यार्थ्यांसोबतची बैठक रद्द

scheduled meeting of Sharad Pawar MPSC students  with CM Eknath Shinde cancelled
scheduled meeting of Sharad Pawar MPSC students with CM Eknath Shinde cancelled
Updated on

पुणे : एमपीएससी परीक्षा जुन्या पध्दतीने घ्यावी यासाठी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पुण्यात चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.

त्यानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होतं. मात्र आजची ही भेट रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अन्य कार्यक्रमात व्यस्त आहेत, त्यामुळे ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आता येत्या दोन दिवसांत ही भेट घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलं आहे.

scheduled meeting of Sharad Pawar MPSC students  with CM Eknath Shinde cancelled
Kasba Byelection : कसब्यात पुणेरी पाट्यांनी वातावरण तापवणारा रंगेहात सापडला; भाजप म्हणते…

मागच्या चार दिवसांपासून नवीन अभ्यासक्रम तसेच परीक्षा पद्धती ही २०२५ पासून लागू करावी आणि याबद्दलचे नोटीफिकेशन लगेच जारी करावे यासाठी विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत आहेत.

scheduled meeting of Sharad Pawar MPSC students  with CM Eknath Shinde cancelled
एवढी कसली भीती? आईने मुलासह स्वतःला ३ वर्ष घेतलं कोंडून; कारण ऐकून बसेल धक्का

परवा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे या आंदोलनस्थळी गेले होते, यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यावेळी पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं शरद पवारांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. यानंतर आज ही बैठक नियोजित होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे हे इतर कामात व्यस्त असल्याने ही भेट रद्द झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.