शाळेच्या पहिल्या दिवशीच पालकांना फटका; स्कूलबसच्या दरात मोठी वाढ

काही दिवसांपूर्वी शालेय साहित्याच्या किमतीही वाढल्याने पालकांना अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागत आहेच.
School Bus
School BusSakal
Updated on

शाळेच्या पहिल्या दिवशीच पालकांना मोठा फटका बसणार आहे. स्कुल बस संघटनेने याबद्दलचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच शालेय साहित्याच्या किमतीही वाढल्या होत्या. त्यापाठोपाठ आता स्कूल बसचे दरही वाढणार आहेत.

आजपासून राज्यातल्या शाळा सुरू होत आहेत. आजपासूनच स्कूल बस संघटनेने स्कूल बसच्या दरात २० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंधन दरात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेने सांगितलं आहे. साधारण ४०० ते ५०० रुपयांची दरवाढ केली जाणार आहे. ३० टक्के दरवाढीची मागणी संघटनेने केली होती. मात्र पालकांच्या अडचणी लक्षात घेता २० टक्के दरवाढ केली आहे.

School Bus
सुट्टी संपली... आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरू

दोन वर्षांपासून कोविडमुळे विद्यार्थी घरुनच शिक्षण घेत होते. मात्र आता शाळा नियमित सुरू झाल्याने पालकांना स्कूल बसचा खर्च करावा लागणार आहे. दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने स्कूल बसही बंद होत्या. त्यामुळे त्यांचंही काही नुकसान झालंय. ते दुरुस्त करावं लागणार आहे, शिवाय इंधनांचेही दर वाढले आहेत. त्यामुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचं स्कूल बस बोनस असोसिएशनने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.