Maharashtra News : जपान सरकारच्या विशेष प्रशिक्षणासाठी भारतातून अमित कोठावदे यांची निवड

Selection of Amit Kothawade from India for special training by Japanese government maharashtra news
Selection of Amit Kothawade from India for special training by Japanese government maharashtra newsesakal
Updated on

Maharashtra News : जपान सरकारच्या ‘उद्योजकता व स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण’ विशेष प्रशिक्षण उपक्रमासाठी संपूर्ण भारतातून महाराष्ट्राची निवड झाली असून, यात महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे सहाय्यक व्यवस्थापक अमित कोठावदे यांची निवड झाली आहे. ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. श्री. कोठावदे हे कळवणचे पुत्र आहेत.

अलीकडच्या काळात स्टार्टअप, इनोव्हेशन हे जागतिक व्यासपीठावर परवलीचे शब्द बनले आहेत. (Selection of Amit Kothawade from India for special training by Japanese government maharashtra news)

विविध देशाच्या आर्थिक प्रगतीत स्टार्टअप्स मोलाची भूमिका बजवत आहेत. भारताव्यतिरिक्त इतर देशही स्टार्टअप आणि उद्योजक समर्थनाची इकोसिस्टम तयार करण्याच्या उद्देशाने धोरणे तयार करत आहेत.

स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी अलीकडच्या वर्षात महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. स्टार्टअप परिसंस्थेची भरभराट मर्यादित न राहाता, इतर देशांची परिणामी जागतिक विकास होण्याच्या दृष्टीने जपान सरकारकडून आशिया व आफ्रिका खंडातील देशांसाठी ‘उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण’ हा विशेष प्रशिक्षण उपक्रम या वर्षी प्रथमच सुरू करण्यात आला आहे.

जपानच्या मित्र देशातील स्टार्टअप व नावीन्यता परिसंस्थेच्या बळकटीकरणासाठी काम करणाऱ्या संस्था यासाठी पात्र होत्या. भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयामार्फत (DOPT) भारतातील सर्व राज्यातून अर्ज मागविण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Selection of Amit Kothawade from India for special training by Japanese government maharashtra news
Maharashtra Fourth Women Policy : महाराष्ट्रात चौथं महिला धोरण येणार; अजित पवारांची घोषणा

महाराष्ट्र शासनाची स्टार्टअपची नोडल एजन्सी, महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत या विशेष उपक्रमासाठी अधिकाऱ्यांचे नामांकन करण्यात आले होते. सर्व देशातील प्राप्त अर्जांचे मूल्यांकन करून जपान सरकारने सर्व देशांतून सर्वोत्तम ११ उमेदवारांची निवड केली आहे.

भारतातून एकमेव, महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे सहाय्यक व्यवस्थापक अमित कोठावदे यांची निवड झाली आहे. कोठावदे हे महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या स्थापनेपासून कार्यरत असून, राज्याची स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यात विशेष भूमिका बजावत आहेत.

‘उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण’ हा विशेष प्रशिक्षण उपक्रम २७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान जपान येथे होणार असून, हा उपक्रम पूर्णतः जपान सरकारद्वारे प्रायोजित आहे. या प्रशिक्षणादरम्यान इतर देशातील स्टार्टअप इकोसिस्टमचे घटक आणि आव्हाने, उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी विविध धोरणे आणि उपक्रम, जपानमधील स्टार्टअप इकोसिस्टम इत्यादी समजून घेण्याची संधी भेटणार आहे.

Selection of Amit Kothawade from India for special training by Japanese government maharashtra news
Earthquake In Maharashtra : पहाटे पहाटे राज्यात बसले भुकंपाचे धक्के !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.