G20 Summit India : G-20 परिषदेच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी 'या' मराठमोळ्या युवकावर; भारतानं टाकला विश्वास!

दिल्लीत जगभरातून २९ देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपती ‘जी - २०’ परिषदेसाठी आले आहेत.
Pramod Dabhole Media Coordinator G20 Summit India Delhi
Pramod Dabhole Media Coordinator G20 Summit India Delhi esakal
Updated on
Summary

प्रमोद दाभोळे याची मीडिया कोऑर्डिनेटर (Media Coordinator) म्हणून निवड केली आहे.

मुरगूड : दिल्ली येथे जगभरातून २९ देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपती ‘जी - २०’ परिषदेसाठी आले आहेत. शनिवारी (ता. ९ ) व रविवारी (ता. १०) होणाऱ्या या बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीवर असून त्या टीमचे प्रतिनिधित्व कागल तालुक्यातील कुरुकली या छोट्याशा खेडेगावातील प्रमोद बाळासो दाभोळे (Pramod Dabhole) हा मराठमोळा युवक करत आहे.

या परिषदेतील (G20 Summit India Delhi) प्रत्येक क्षणांचे प्रक्षेपण जगभरातील नागरिकांना घरबसल्या पाहता येणार आहे. पण, त्यासाठी बैठकीत प्रसार माध्यमांना परवानगी नाही. या बैठकीतील इत्यंभूत माहिती माध्यमांना देता यावी यासाठी एका खासगी कंपनीकडे हे लाईव्ह टेलिकास्टचे काम सोपवले आहे.

Pramod Dabhole Media Coordinator G20 Summit India Delhi
Maratha Reservation चा तिढा सुटणार? जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा, मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत काय घडलं?

या नामांकित कंपनीची एक टीम हे सर्व काम पाहणार आहे. त्या टीमचे प्रतिनिधित्व प्रमोद करणार आहे. २१ जानेवारी २०२० मध्ये प्रमोदने विदेश मंत्रालयात व्हिडिओ एडिटर, ग्राफिक्स डिझायनर व टेक्निकल असिस्टंट म्हणून एका नामांकित कंपनीकडे काम सुरु केले. तिथे त्याने लाईव्ह ट्रिस्मिंगचे काम केले.

Pramod Dabhole Media Coordinator G20 Summit India Delhi
Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट आरक्षण दिल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात? बैठकीत अधिकाऱ्यांनी मांडली मतं

२०२० ते २०२२ या कालावधीत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांचे व्हिडिओ एडिटींग, लाईव्ह ट्रिस्मिंगचेही काम केले. डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले. त्यावेळीही प्रमोद यांची टीम त्यांच्यासोबत होती. आता ‘जी २० ’चे काम पाहण्यासाठी संबंधित कंपनीला दिल्लीला बोलवले. त्यामध्ये प्रमोद दाभोळे याची मीडिया कोऑर्डिनेटर (Media Coordinator) म्हणून निवड केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.