सोलापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांनुसार दोन सत्रात किमान ९० दिवसांचे अंतर (अध्यापनाचे दिवस) बंधनकारक आहे. पण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आठवड्यातील रविवार, सार्वजनिक सुट्या, आविष्कार महोत्सवाचे दिवसही ९० दिवसांत धरले आहेत. २० नोव्हेंबर २०२३ ते १९ जानेवारी २०२४ पर्यंत मागील सत्र परीक्षा संपली आणि आता लगेच २० मार्चपासून सत्र परीक्षा सुरू होत आहे. ७० दिवसांपेक्षाही कमी अध्यापन झालेले असतानाही परीक्षा द्यावी लागत असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ महाविद्यालये असून त्याअंतर्गत दरवर्षी ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान, शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला अभ्यासक्रमनिहाय प्रथम व द्वितीय सत्राचा कालावधी निश्चित केला जातो. पण परीक्षांचे वेळापत्रक ठरविले नाही. त्यामुळे ऐनवेळी किंवा लागोपाठ होणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
कोरोनामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक सत्रांची घडी बसविण्याच्या नादात परीक्षा व निकालाची घाई होते. त्यामुळेच मागील परीक्षेत काही विद्यार्थ्यांना पैकीपेक्षाही अधिक गुण मिळाले होते. दुसरीकडे निकाल, फोटोकॉफी, पुनर्मूल्यांकनासाठी काही दिवस जाता. त्यानंतर सार्वजनिक व साप्ताहिक सुट्यांमुळे ९० दिवसांचे अध्यापन होत नाही. तरीसुद्धा त्याची खात्री न करता कागदांवर बोट ठेवून विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी घसरत असल्याचेही बोलले जात आहे.
प्रथम व द्वितीय सत्राचे नियोजन...
१) कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, एमएसडब्ल्यू (पदवी व पदव्युत्तर) अभ्यासक्रमाचे पहिले सत्र १३ जुलैला सुरू होऊन ३० नोव्हेंबरला संपले. तर द्वितीय सत्र १४ डिसेंबर २०२३ पासून ३० एप्रिल २०२४ पर्यंत चालेल.
२) विधी व शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचे पहिले सत्र १३ जुलै ते ३० नोव्हेंबर या कालावधीपर्यंत तर १४ डिसेंबर २०२३ ते ३० एप्रिलपर्यंत द्वितीय सत्र सुरू राहील.
३) अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन अभ्यासक्रम एमबीएचे प्रथम सत्र १ ऑगस्ट ते १५ डिसेंबरपर्यंत तर १ जानेवारी ते ३१ मे २०२४ पर्यंत द्वितीय सत्र सुरु राहणार आहे.
एका वर्षातील दिवसांचा हिशोब
दोन्ही सत्र परीक्षांचा कालावधी
९५ ते १०० दिवस
वर्षातील एकूण सुट्या
७५ दिवस
अध्यापनाचे दिवस
१८०
युवा महोत्सवासह इतर कार्यक्रम
१५ दिवस
९० दिवस झाल्याची खात्री करूनच वेळापत्रक
कोरोना काळात शैक्षणिक वर्षे विस्कळित झाल्याने परीक्षांचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. त्यातूनही विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीनुसार अध्यापन झाल्याची खात्री झाल्याशिवाय परीक्षा घेतली जात नाही. मागील सत्र परीक्षा होऊन ९० दिवस पूर्ण झालेल्यांची पहिल्यांदा परीक्षा होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परीक्षा सुरुच राहतील.
- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.