'निवडणुकीत शिवसेना खासदारांच्या आई भाजपसोबत, किंमत मोजावी लागेल'

मंत्री यड्रावकर, निवेदिता मानेंना किंमत मोजावी लागेल
Sanjay Pawar
Sanjay PawarESakal
Updated on

कोल्हापूर : शिवसेनेच्या जीवावर आमदार, खासदार, मंत्री झालेले लोक विरोधकांसोबत जिल्हा बॅंकेची (Bank Election)निवडणूक लढवत आहेत, अशांना लाज वाटली पाहिजे, विरोधकांसोबत गेलेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,(Rajendra Patil Yadravkar) माजी खासदार श्रीमती निवेदिता माने (Nivedita Mane) यांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दिला. जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त शासकीय विश्रामगृहात काल (ता. २३) आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.

जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar)म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सेनेतून खासदार झालेल्यांच्या मातोश्री आणि आमच्या भगिनी माजी खासदार निवेदिता माने यांनी इतिहास विसरून भाजपसोबत गेलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सोबत दिली आहे. शिवसेनेच्याच खासदारांच्या आई भाजपसोबत जातात, हे दुर्दैवी आहे. ज्यावेळी त्यांच्याकडे काही नव्हते त्यावेळी सेनेने त्यांना दिले, हे त्या विसरल्या आहेत. त्यामुळे आता स्वार्थी नेते विरुद्ध स्वाभिमानी शिवसेना कार्यकर्ते अशा लढाई सुरू झाली आहे. सेनेने ज्यांना मंत्रिपद दिले तेही सेनेच्या चिन्हावर निवडणूक न लढता सत्तारूढ गटाच्या चिन्हावरच निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेच्या महिला आघाडीनेही पुढाकार घेतला पाहिजे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत निश्‍चितपणे आपला विजय होणार यात शंका नाही.’’

जि.प.चे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील (Sarjerao Patil)म्हणाले, ‘‘आपल्या पक्षातून ज्यांची आमदार, खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर ते पक्षाकडे पाहत नाहीत. शिवसेनेचा केवळ स्वार्थासाठी उपयोग घेतात अशा लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे. आता भविष्यात हे चालू देणार नाही.’’

Sanjay Pawar
कॉंग्रेस-राष्ट्रवादी, सेनेचे उमेदवार ठरवणार असतील तर चालणार नाही

कामाला लागा

आमच्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेच अस्तित्व आहे, असे कोणालाही वाटू नये. यासाठी, खासदार संजय मंडलिक यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक खूप मनावर घेतली आहे. शिवसैनिकांनी कामाला लागले पाहिजे, अशा सूचनाही मंडलिक यांनी दिल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

गावागावात संस्था

जिल्ह्यात गावागावात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सहकारी संस्था सुरू झाल्या तरच आपला दबदबा वाढू शकतो. सरकार आपले आहे. त्यामुळे जेवढ्या म्हणून संस्था काढता येतील तेवढ्या उभारून सर्वसामान्यांची मदत करा, असेही मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

स्वत:ची मुलगी म्हणून ओळख

बाळासाहेब ठाकरे कोल्हापूरमध्ये आले त्या वेळी त्यांनी निवेदिता माने यांना स्वत:ची मुलगी म्हणून ओळख दिली. राजकारणासह सर्वच क्षेत्रात मदतीची ग्वाहीही दिली होती; पण माजी खासदार माने आता ते विसरल्याची टीका पवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.