Senapati Bapat : मुळशीचा पॅटर्नच वेगळा; धरणविरोधी लढ्यांची पायाभरणी करणारे सेनापती बापट

शेती इकायची नसते ओ, राखायची असते’ हा मुळशी पॅटर्नमधील एक डायलॉग
Senapati Bapat
Senapati Bapat esakal
Updated on

Senapati Bapat : ‘शेती इकायची नसते ओ, राखायची असते’ हा मुळशी पॅटर्नमधील एक डायलॉग आहे. जो आज प्रकर्शाने आठवतो. कारण एक काळ आसाही होता ज्यावेळी तूम्हाला शेती विकायची की नाही हे विचारले जात नव्हते. तर तूमच्या अंगावरील कपडे वादळाने हिसकावून घ्यावेत तसे शेती घेतली जायची.

Senapati Bapat
Priya Bapat: आईनं माझा बोल्ड सीन पाहिल्यावर सांगितलं, 'तू आता...'

आणि मग लोकांच्या नशिबासकट सगळं घरदार उघड्यावर यायचं. हे चित्र पालटण्यासाठी आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी एका क्रांतिकारांनी लढा दिला होता. त्यांचे नाव होते पांडुरंग महादेव ऊर्फ सेनापती बापट.

Senapati Bapat
Priya Bapat: नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच लघुशंका आली.. प्रिया बापटचा भन्नाट किस्सा

स्वातंत्र्य संग्रामात ज्या दिग्गज स्वातंत्र्यविरांची नावे घेतली जातात. त्यामध्ये आदराने आणि तितक्याच अभिमानाने एक नाव तोंडी येते ते म्हणजे स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट हे होय. कारण, इंग्रज सरकारच्याच शिष्यवृत्तीवर ब्रिटनमध्ये शिकायला गेलेल्या बापटांनी तिथेच आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आंदोलने सुरू केलीत. याच महान क्रांतीकाराने एक लढा दिला होता. जो आजही मूळशी पॅटर्न म्हणून ओळखला जातो. आज सेनापती बापट यांच्या जयंती दिनी त्याच लढ्याविषयी जाणून घेऊयात.

Senapati Bapat
Girish Bapat : लोकसभेसाठी पुण्यातून गिरीश बापटांचा पत्ता कट? वाचा सविस्तर

बापट यांचे संपूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असे होते. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावी १२ नोव्हेंबर, १८८० रोजी झाला. शालेय जीवनात ते एक हुशार विद्यार्थी होते. त्यामूळे इतर भावांनी आपल्या सुखांचा त्याग करून त्यांना शहरात शिक्षणासाठी पाठवले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. तथापि, कॉलेज जीवनातच त्यांच्या मनात आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासंबंधीचे विचार घोळू लागले.

Senapati Bapat
Health: हिवाळ्यात या पद्धतीने घ्या कोरड्या त्वचेची काळजी!

देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला पाहिजे असे त्यांना वाटत होते. सतत देशाचा विचार करणाऱ्या बापटांनी १९०२ मध्ये देशसेवेची शपथ घेतली. बी. ए. ची पदवी संपादन केल्यावर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.

Senapati Bapat
Astro Tips For Money : घरात पैसा टिकत नाही? करा हा उपाय

इंग्लंडमध्ये ‘इंडिया असोसिएशन’चे ते सदस्य बनले. त्यानंतर क्रांती घडवून भारतातील इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याचे मनसुबे ते रचू लागले. क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या यांच्या मदतीने सेनापती बापट बॉम्ब बनवायला शिकले. पॅरिसमध्ये काही दिवस राहून त्यांनी एका रशियन युवतीकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले. त्यासंबंधीची पुस्तिकाही त्यांनी भारतात पाठविली.

Senapati Bapat
Shani Astro Theory : तुमच्या कुंडलीतील शनी ठरवतो आयुष्याची दिशा, जाणून घ्या महत्वपूर्ण सिद्धांत

इंग्लंडमधील वास्तव्यातही त्यांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचाच ध्यास लागून राहिला होता. अखेर ही संधी त्यांना १६ एप्रिल १९२१ रोजी मिळाली. कारण हाच रामनवमीचा मुहूर्त साधत महाराष्ट्रात एका लढ्याचे रणशिंग फुकले गेले. ते म्हणजे मूळशी धरण लढा होय.

Senapati Bapat
Winter Health : सतत आजारी पडत असाल तर या सवयी लगेच बदला

मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी हे धरण बांधणार्‍या आणि लोकांचा संघर्ष चिरडून टाकण्यार्‍या टाटा कंपनीच्या विरोधात हा लढा होता. मुळा आणि नीला नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेल्या मुळशी धरणाच्या विरोधात सुरू झालेला लढा हा भारतातील आणि कदाचित जगातील देखील, पहिला धरणविरोधी संघर्ष होता.

Senapati Bapat
Sharad Pawar Meets Girish Bapat : शरद पवारांनी केली खासदार गिरीश बापटांच्या तब्येतीची विचारपूस

मूळशी धरण बांधण्याचा घाट टाटा कंपनीने घातला होता. त्या धरण क्षेत्रासाठी तब्बल ५२ गावांवर जमिनदोस्त होण्याची वेळ आली होती. त्यावेळी नेतृत्व सेनापती बापट आणि वि. म. भुस्कुटे यांनी एक तिव्र लढा दिला. त्याला मुळशी सत्याग्रह म्हणून ओळखला गेला.

Senapati Bapat
Priya Bapat: मन गार्डन गार्डन! प्रिया बापटचं ते झक्कास कॅप्शन

१६ एप्रिल १९२१ रामनवमीच्या दिवशी झालेला हा शक्तिशाली संघर्ष केवळ धरणाखाली गेलेल्या ५२ गावांमध्येच नव्हे तर बाहेरही अगदी पुण्यापर्यंत आणि त्यापलीकडे पसरला होता. स्वत:चं घरदार वाचवण्यासाठी अनेक महिलाही यात सहभागी झाल्या होत्या.

Senapati Bapat
Girish Bapat: तीन दिवसांत पुण्यातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन

इंग्रज सरकार हिंसेच्या, अत्याचाराच्या जोरावर आंदोलकांना चिरडत होते. तर, महात्मा गांधीजींच्या तत्वावर चालत अहिंसेच्या हातात हात धरून हे आंदोसन पूर्णत्त्वास नेण्यासाठी प्रयत्न करत होते. हा लढा देताना बापट यांना अनेकदा तुरूंगात जावे लागले. पण पून्हा त्यांनी त्या जागेवर जात लढा सुरूच ठेवला.

Senapati Bapat
Shani Astro Theory : तुमच्या कुंडलीतील शनी ठरवतो आयुष्याची दिशा, जाणून घ्या महत्वपूर्ण सिद्धांत

गावोगावी हिंडून शेतकर्यांना घेऊन परत संघर्ष चालू केला. आंदोलकर्त्याना प्रसंगी मारहाण करण्यात आली. त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हावे यासाठी अत्याचार केले गेले. त्यांच्यावर कडक पाणी फवारले गेले. पण, गावकरी आणि बापटांनी माघार घेतली नाही. त्यांची एक घोषणा प्रसिद्ध होती. “यह मुलशी रण मुल है महाराष्ट्र निद्रा भंग का, यह मुलशी रण मूल मानो भावी भारत के जंग का’.

Senapati Bapat
Astro Tips : आत्ता कच्च्या दुधाने करा वक्री ग्रहांना शांत

अनेक आंदोलनकर्ते उत्साहाने लढा द्यायला येतात. पण, काही काळ लोटला की तेही विसरून जातात. पण, मूळशीसाठी सेनापती बापट, त्यांचे सहकारी आणि गावकऱ्यांनी सलग तीन वर्षे सत्याग्रह आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी झाले नाही पण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला या मुळशी सत्याग्रहाने दिशा दाखवली.

Senapati Bapat
Astro Tips : या दिवशी केस अन् नखे अजिबात कापू नये, जडतील अनेक व्याधी; जाणून घ्या कधी कापावे

आता या अशा गोष्टींसाठी अन्यायासाठी अनेक कायदे आहेत. त्यामूळे जमिनी हिसकावून घेण्याचे प्रकार तसे बंदच झाले आहेत. पण, संपूर्ण देशाला जमिनी बचावासाठी लढा देणारे सेनापती बापट यांनी त्या काळात दिलेला हा लढा म्हणजे त्रिखंडात दिल्या जाणाऱ्या धरणविरोधी लढ्यांची पायाभरणीच होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.