'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल... ओकेमध्ये हाय...' या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू पाटील सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. आठ दिवसात त्यांनी नऊ किलो वजन कमी केलं आहे. (Shahaji Bapu Patil Weight loss nine kg eight days maharashtra politics )
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमात शहाजीबापू पंचकर्म उपचार घेत होते. 24 डिसेंबर रोजी शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले होते.
Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
कसं केलं कमी केलं वजन
बंगळूरू येथील आश्रमात 24 डिसेंबरपासून बापूंचा हा आयुर्वेदिक कार्यक्रम सुरु झाला होता. पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने करायची , यानंतर उकडलेल्या पालेभाज्या , कडधान्ये याचा नाश्ता करून दुपारी बौद्धिक ऐकायचे आणि ध्यान धारण करायचे. वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम करायचा, संध्याकाळी मेडिटेशन. असा त्यांचा दिनक्रम होता.
ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत
शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे. 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल... ओकेमध्ये हाय...', अशी ऑडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देत आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहटी गाठली. त्यानंतर काळजीपोटी एका कार्यकर्त्यानं शहाजी पाटील यांना फोन लावला आणि शहाजीबापूंनी गुवाहटीचं जे वर्णन केलं ते चांगलचं व्हायरलं झालं होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.