Maratha Reservation : मनोज जरांगेंना दिलेला 'तो' शब्द पाळावा; शाहू छत्रपती महाराजांचं सरकारला महत्त्वाचं आवाहन

शासनास मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणे शक्य आहे.
Maratha Community Reservation Special Session
Maratha Community Reservation Special Sessionesakal
Updated on
Summary

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज (ता. २०) विशेष अधिवेशन होत आहे.

कोल्हापूर : `मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांना दिलेला शब्द शासनाने पाळावा’, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी पत्रकारांशी बोलताना केले. नर्सरी बागेत शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते.

Maratha Community Reservation Special Session
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज अधिवेशन

शाहू महाराज म्हणाले, ‘शासनास मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणे शक्य आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शासनाने २० व २१ फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Special Session) बोलावले आहे. त्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय होईल, असे वाटते.’ दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू केले आहे. ते आंदोलन पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Maratha Community Reservation Special Session
Nilesh Rane : भास्कर जाधवांची चिपळूणमधील भाईगिरी संपवणार; राड्यानंतर नीलेश राणेंचा गर्भित इशारा

त्यासंबंधी त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे हित जपणे महत्त्वाचे आहे. भारत देश कृषीप्रधान असून, शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यायला हवेत आणि त्यांची सोडवणूक करायला हवी.’ दरम्यान, लोकसभेसाठी शाहू महाराज यांचे नाव चर्चेत आले असून, महाविकास आघाडीतर्फे त्यांची उमेदवारी घोषित केली जाईल, अशी शक्यता आहे. याबाबतच्या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन बाळगले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()