Rajarshi Shahu Maharaj :महाराष्ट्रात हरितक्रांतीची पहिली मुहूर्तमेढ शाहू महाराजांनी रोवली

शेतकन्याची भरभराट व्हावयाची असेल तर प्रगत शेतीच्या जोडीला सहकारी चळवळीची जोड मिळणे आवश्यक आहे हे शाहूमहाराजांनी ओळखले म्हणून...
shahu maharaj jayanti
shahu maharaj jayantisakal
Updated on

हरितक्रांतीची मुहूर्तमेढ शेती ही पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करावयास पाहिजे असे त्यांचे मत होते. शेतकऱ्यांचे पावसाच्या पाण्यावरचे परावलंबित्व दूर करून शेती खात्रीची व्हावी, यासाठी लक्ष्मीबाई तलावाचे काम त्यांनी हाती घेतले. इतरही वीस तलाव त्यांनी बांधले. त्या परिसरातील शेतकरी वर्ग उद्योगी त सधन झालेला आपण पाहतो. महाराष्ट्रात हरितक्रांतीची पहिली मुहूर्तमेढ श्रीशाहू महाराजांनी रोवली.

शेतकन्याची भरभराट व्हावयाची असेल तर प्रगत शेतीच्या जोडीला सहकारी चळवळीची जोड मिळणे आवश्यक आहे हे शाहूमहाराजांनी ओळखले म्हणून त्यांनी १९१२ मध्ये संस्थानात सहकारी कायदा मंजूर केला आणि सहकारी चळवळीस प्रेरणा दिली.

शेतकऱ्यांच्या उन्नतीप्रमाणेच काम कऱ्यांच्या उन्नतीची तळमळ महाराजांना होती. १९१८ मध्ये मुंबईस परळ येथे भरलेल्या कामगारांच्या प्रचंड समेत अध्यक्ष म्हणून भाषण करताना ते म्हणतात, 'आपल्या हिंदुस्थानातील स्थिती पाहू गेल्यास इकडे मुख्य मागासलेला वर्ग म्हणजे शेतकऱ्यांचा आहे व मीही त्यापैकीच एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे, त्याची आर्थिक उन्नती साधणे यासाठी महाराजानी उच्चवर्णीय काय आक्षेप घेतील याची तमा न बाळगता अभूतपूर्व निर्णय घेतले.

कारखान्यात मजुरी करणारे आपण सर्व शेतकरीच आहोत तेव्हा सर्वांविषयी एकत्र विचार करणे सोयीचे आहे. मजूरदार व इतर मागासलेले यांच्या हिताचे संरक्षण करणे या हिंदुस्थान देशातही जरुरीचे आहे. पाश्चात्त्य देशात मजूरदार लोकांनी संघटना बळकट करून आपली स्थिती सुधारली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या प्रतिनिधींचा प्रधान मंडळात समावेश करून घेतला आहे.' असे सांगून महाराज कामगारांना संघटनांची महती सांगतात. पाश्चात्त्य देशाचा दाखला देऊन ते म्हणतात, 'तिकडेही भांडवलवाले लोकांची मजूरदार लोकांवर बेसुमार सत्ता चाले. पण आता मजूरदार लोकांनी आपले संघ बनविले आहेत. गवताच्या एकेका काडीची ताकद जास्त नसते. पण अशा अनेक काड्यांचा वेठ वळला तर त्याने हत्तीलाही बांधता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.