'शक्तिपीठ' मार्गाला पुन्हा 'शक्ती? शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्याची सरकारची तयारी; राजू शेट्टींना रस्ते महामंडळाचे पत्र

State Road Development Corporation : शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात बागायती जमीन जात असल्याने, पश्चिम महाराष्ट्रात मोठा विरोध झाला.
Raju Shetti Shaktipeeth Highway
Raju Shetti Shaktipeeth Highwayesakal
Updated on
Summary

या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रदेशातील धार्मिक स्थळांची यात्रा कमीत कमी वेळेत करता येणार आहे.

मुंबई : कोल्हापूर, सांगली, नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या विरोधानंतर वादात सापडलेल्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway) भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, संबंधित शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्याची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळाने (State Road Development Corporation) दर्शविली आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना तसे पत्र महामंडळाने पाठविले आहे.

मुळात नवीन भूसंपादन कायद्यानुसार (Land Acquisition Act) नुकसानभरपाईची रक्कम ही दुपटीपेक्षा अधिक देता येत नसताना, ‘पाच पट’ मोबदला हा सरकारचा नवा डाव, की जमिनीसाठी केलेली धूळफेक याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.’

Raju Shetti Shaktipeeth Highway
'...तर मविआच्या उमेदवाराचा 74 हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला असता, तोंड दाखवायलाही जागा उरली नसती'

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात बागायती जमीन जात असल्याने, पश्चिम महाराष्ट्रात मोठा विरोध झाला. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग नको, यासाठी आंदोलने झाली. त्याचा दणका लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या खासदारांना बसला. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनीही या महामार्गास विरोध दर्शविला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे या महामार्गाबाबत विचारणा केली होती. त्यावर आलेल्या पत्रात ‘शक्तिपीठ’साठी पाचपट मोबदला देण्याची तयारी दर्शविल्याचे आढळून आले आहे.

या ८०२ कि.मी. महामार्गासाठी तब्बल २७ हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे या महामार्गाने जोडली जाणार आहेत. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रदेशातील धार्मिक स्थळांची यात्रा कमीत कमी वेळेत करता येणार आहे. सध्या नागपूर ते गोवा हे अंतर पार करण्यासाठी १८ तास लागतात. महामार्गामुळे हे अंतर केवळ ८ तासांत पार करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भूसंपादनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Raju Shetti Shaktipeeth Highway
Siddheshwar Temple Auction : अहो खरंच... एका नारळाची किंमत तब्बल 65 हजार तर, कोथिंबिरीची जोडी 10 हजार 500 रुपये

पत्रातील ठळक बाबी

  • जमीनमालकांनी स्वतःहून प्रकल्पास लागणारी जमीन दिल्यास, समृद्धी महामार्गाप्रमाणेच रेडीरेकनर दराच्या पाच पट मोबदला देण्याची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळाने दर्शविली आहे

  • राज्य शासन आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन हा महामार्ग केला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी टोल धोरण अवलंबिले जाणार

  • शक्तिपीठ महामार्ग १२ जिल्ह्यांतील ३९ तालुके आणि या तालुक्यातील ३७२ गावांमधून जाणार

  • भूसंपादनासाठी अंदाजे ८,७२४.५४ कोटी इतक्या रकमेची आवश्यकता

या दुरुस्तीमुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. तो समृद्धी महामार्गाच्या मोबदल्याच्या ४० टक्के आहे. त्यामुळे कोल्हापूर व नांदेड जिल्ह्यांतील शक्तिपीठ महामार्ग रद्द केला तरी उर्वरित राज्यात याला विरोध होणारच आहे. सरकारने अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करू नये.

-राजू शेट्टी, माजी खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.