मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (ajit pawar) संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना (jarandeshwar suger factory) तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स (income tax) विभागाकडून छापेमारीची (income tax raid) कारवाई सुरु आहे. त्यावर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनी पाटील (shalini patil) यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.
अजित पवार खोटं बोलतात; शालिनी पाटलांचा जोरदार हल्ला
अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय. (Shalini Patil alleges that Ajit Pawar is lying in Jarandeshwar case) जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही. सत्तेचा दुरुपयोग करुन कारखाना ताब्यात घेतला आहे. आयकर विभागानं माझ्याकडून लेखी स्वरुपात तक्रार अर्ज घेतलेला आहे. ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
न्यायालयात माझी लढाई सुरुच
अजितदादांवर आयकर विभागाच्या ज्या धाडी पडल्या आहेत, त्या जरंडेश्वरसाठीच पडल्या आहेत. न्यायालयात माझी लढाई सुरुच आहे. साखर कारखान्यांचे भागधारक शेतकरी आहेत. त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळणार, असंही शालिनी पाटील यांनी म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.